Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : सिडको औद्योगिक पोलिसांची मोहिम , २१ वर्षानंतर जबरी चोरीतील आरोपी पकडला

Spread the love

औरंगाबाद  : १९९८ साली जबरी चोरी केलेला व न्यायालयाने फरार घोषात केलेला आरोपी सिडको पोलिसांनी आज ग्रामीण परिसरातून अटक केला.
अमजतखान पिता जुमानखान (४०) रा.चितेगाव असे अटक आरोपीचे नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून एम.सिडको पोलिसांनी पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्या आदेशावरुन न्यायालयाने एम. सिडको पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपींना शोधण्याची मोहिम हाती घेतली आहे.सोमवारी पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षांपासुन फरार असलेले तीन आरोपी एम. सिडको पोलिस ठाण्याच्या पथकाने शोधून आणले.
अटक केल्यानंतर जामिनावर बाहेर आलेले आरोपी न्यायालयाच्या तारखांना हजर राहणे टाळंत होते. या मधे २०१४साली अनैसर्गिक कृत्य व जबरी चोरी केलेला मयुर हिवरकर आणि आकाश शेजवळ यांना अटक केली. तर पोटगीच्या गुन्ह्यातील पवन बाबासाहब हराळै(२८) रा. सावित्रीनगर चिकलठाणा याला अटक केली. न्यायालयाने हराळे ला पोटगी पोटी घटस्फोटीत पत्नीला दरमहा २५हजार रु.देण्याचे आदेश दिले होते. या आदूशाचे हराळेने उल्ंघन करुन बेपत्ता झाला होता. तर चेक बाऊन्स प्रकरणातील आरोपी संजय राऊत रा. रेवकी ता. गेवराई जि.बीड यालाही अटक करुन कोर्टासमोर हजर केले.
या कारवाईत पीएसआय सुरेश जारवाल, ए एसअय आघाव, पोलिस कर्मचारी मुनीर पठाण, पुंजाराम सुरासे यांनी सहभाग नोंदवला

आपलं सरकार

Click to listen highlighted text!