आपलं सरकार : राज्याच्या महाधिवक्तापदी आशुतोष कुंभकोणी कायम

Advertisements
Advertisements
Spread the love

राज्यातील सत्तापालटानंतरही राज्याचे महाधिवक्ता (ऍडव्होकेट जनरल) म्हणून ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांचीच नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आदेशानुसार राज्याच्या विधी व न्याय विभागाने यासंदर्भातील अधिसूचना काढली आहे.

Advertisements

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी प्रथेप्रमाणे आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपालांनी हा राजीनामा मंत्रिमंडळाच्या विचारार्थ पाठवला. मंत्रिमंडळाने ४ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत कुंभकोणी यांचा राजीनामा अस्वीकृत ठरवून त्यांनाच यापदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तो राज्यपालांना कळवला. त्यानुसार राज्यपालांच्या आदेशाप्रमाणे कुंभकोणी यांनाच कायम ठेवण्याविषयीची अधिसूचना मुख्य सचिव अजय मेहता यांच्या स्वाक्षरीने ७ डिसेंबर रोजी काढण्यात आली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार