Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Bad News : जिओच्या ऑल-इन-वन प्लानच्या किंमती वाढल्या, मोबाईलवर बोलणे आणि नेट वापरणे झाले आता महाग….

Spread the love

लोकांना मोबाईलची चांगलीच सवय लागलेली असताना आता मोबाईल कंपन्यांच्या नव्या वाढलेल्या दराचा सामना करावा लागणार आहे. सुधारित दरपत्रकानुसार व्होडाफोन आयडियाच्या वर्षभर वैध असणाऱ्या प्लॅनसाठी आता ५० टक्के दरवाढीसह १,४९९ रुपये मोजावे लागणार आहे . आतापर्यंत हा प्लॅन ९९९ रुपयांना उपलब्ध होता. याच श्रेणीतील १,६९९ रुपयांचा अन्य प्लॅन आता २,३९९ रुपयांना मिळेल. याशिवाय व्होडाफोनवरून अन्य नेटवर्कच्या फोनला कॉल केल्यास प्रतिमिनिट सहा पैसे आकारले जातील. व्होडाफोन आयडियाने गेली चार वर्षे दर स्थिर ठेवले होते. मात्र, जिओच्या आगमनानंतर बाजारहिस्सा कमी झाल्याने तसेच, विविध थकीत शुल्कांपोटी केंद्र सरकारला सुमारे ८० हजार कोटी रुपयांचे देणे बाकी असल्याने या कंपनीची आर्थिक स्थिती कमजोर झाली आहे. दरम्यान रिलायन्स जिओ देखील ६ डिसेंबरपासून टेरिफ दर वाढवणार आहे.

दूरसंचार कंपन्यांनी टेरिफ प्लान्सचे दर वाढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. व्होडाफोन, आयडिया आणि एअरटेलचे नवे दर लागूही झाले आहेत.  प्लान्स ४० टक्क्यांपर्यंत वाढतील, असं कंपनीने यापूर्वीच पत्रक जारी करत स्पष्ट केलं होतं. व्होडाफोन आणि एअरटेलचे प्लान्सही ४२ टक्क्यांपर्यंत महागले आहेत.

एअरटेल, ‘जिओ’चीही घोषणा

व्होडाफोनसह भारती एअरटेल व रिलायन्स जिओनेही रविवारी दरवाढीची घोषणा केली. सुधारित दरपत्रकानुसार एअरटेलच्या दरात ४२ टक्के वाढ झाली आहे. एअरटेलकडूनही अन्य नेटवर्कच्या कॉलसाठी प्रतिमिनिट सहा पैसे आकारले जाणार आहेत. एअरटेलचा वर्षभर वैध असलेला सध्याचा १,६९९ रुपयांचा अमर्यादित प्लॅन आता २,३९८ रुपयांना उपलब्ध होईल. तर, सध्या ४५८ रुपयांत मिळणाऱ्या ८४ दिवसांच्या प्लॅनसाठी ग्राहकांना ५९८ रुपये मोजावे लागतील. ‘अमर्यादित श्रेणीतील प्लॅन निवडणाऱ्या आमच्या ग्राहकांना सध्याच्या प्लॅनच्या तुलनेत (वेगवेगगळ्या प्लॅननुसार) दररोज ५० पैसे ते २.८५ रुपये अधिक द्यावे लागतील. त्याचवेळी त्यांना अधिकचा डेटाही मिळेल,’ असे ‘एअरटेल’च्या पत्रकात म्हटले आहे. रिलायन्स जिओचे नवे दर सहा डिसेंबरपासून लागू होणार असून ही दरवाढ ४० टक्क्यांपर्यंत असेल.

रिलायन्स जिओ

नेटिझन्सना मोबाईलचे वेड लावणाऱ्या रिलायन्स जिओने  आता त्यांच्या ऑल-इन-वन प्लानच्या किंमती वाढवल्या आहेत. त्याचप्रमाणे डेटा बेनिफिट्समध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे. नवीन सुधारणेनुसार यापुढे ग्राहकांना संपूर्ण वर्षासाठी जिओच्या ऑल-इन-वन प्लान उपलब्ध असणार आहे. महिन्यासाठी १९९ रुपयांचा प्लान तर २ हजार १९९ रुपयांचा वार्षिक प्लान ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत.

असे  आहेत जिओचे ऑल-इन-वन प्लान

१९९ रुपयांच्या मासिक प्लॅनमध्ये रोज दीड जीबी डेटा व बिगरजिओ क्रमांकांसाठी १००० मिनिटे कॉलिंगची सेवा असणार आहे.

३९९ रुपयांचा प्लान – यामध्ये दोन महिने कालावधीच्या प्लॅनमध्ये रोज दीड जीबी डेटा व बिगरजिओ क्रमांकांसाठी २००० मिनिटे कॉलिंग.

५५५ रुपयांचा प्लान – तीन महिने कालावधीच्या प्लॅनमध्ये रोज दीड जीबी डेटा व बिगरजिओ क्रमांकांसाठी ३००० मिनिटे कॉलिंग.

जिओचा वार्षिक प्लान – २१९९ रुपयांच्या १२ महिने कालावधीच्या प्लॅनमध्ये रोज दीड जीबी डेटा व बिगरजिओ क्रमांकांसाठी १२००० मिनिटे कॉलिंग.

– जिओचे प्रतिदिन दोन जीबीचे डेटाप्लॅनही उपलब्ध असून ते २८ दिवस २४९ रुपये, ५६ दिवस ४४४ रुपये व ८४ दिवस ५९९ रुपये या प्रमाणे आहेत.

जिओचे किफायतशीर प्लॅन – १२९ रुपये (२८ दिवस), ३२९ रुपये (८४ दिवस) आणि १२९९ रुपये (३६५ दिवस) यानुसार हे प्लान ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत. या प्लॅनमध्ये पूर्ण कालावधीसाठी अनुक्रमे दोन जीबी, सहा जीबी व २४ जीबी एवढाच माफक डेटा मिळणार आहे.

एअरटेल, व्होडाफोन आयडियाने त्यांच्या नवीन प्लान्सच्या दरात वाढ केल्यानंतर रिलायन्स जिओनेसुद्धा त्यांचे प्लान्स अद्ययावत केले आहेत. पूर्वी आकारण्यात येणाऱ्या दरांमध्ये ४० टक्के वाढ झाली असली तरी नवीन प्लान्समध्ये ग्राहकांना ३०० टक्के जास्त सोयी देण्यात आल्याचे रिलायन्स जिओकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान एअरटेलची दरवाढ ३ डिसेंबरपासून लागू झाली असून जिओचे नवे दर ६ डिसेंबरपासून अंमलात येतील. व्होडाफोन आयडियाचे दर ५० टक्क्यांपर्यंत तर एअरटेलचे दर ४२ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. जिओची दरवाढ साधारण ३९ टक्क्यांची आहे.

ऑल इन वन प्लान

रिलायन्स जिओने ऑल-इन-वन अंतर्गत चार प्लान लाँच केले आहेत, जे २२२, ३३३, ४४४ आणि ५५५ रुपयांचे आहेत. २२२ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस, ३३३ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवस आणि ४४४ रुपयांच्या प्लानची वैधता ८४ दिवस असेल. या तीनही प्लान्समध्ये जिओ टू जिओ अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स, दररोज २ जीबी डेटा, १०० एसएमएस आणि १००० आययूसी मिनिटे मिळतील.

जिओचे प्लान्स ६ डिसेंबरपासून महागणार आहेत. त्यामुळे ४४४ रुपयांचा रिचार्ज नवे दर लागू होण्यापूर्वीच करावं लागेल. ‘ग्राहकांच्या हितासाठी समर्पित राहत जिओकडून भारतीय दूरसंचार क्षेत्राला सांभाळण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचललं जाईल’, असं जिओने म्हटलं आहे. प्लान महागल्यानंतर ग्राहकांना कंपनीकडून ३०० टक्के फायदा दिला जाईल, असंही कंपनीने म्हटलं आहे जिओचे ऑल इन वन प्लान्स एफयूपी लिमिटसह येतात. व्होडाफोन-आयडिया, एअरटेल आणि जिओ या तीन कंपन्यांचे जवळपास १०० कोटी ग्राहक आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!