महाविकास आघाडीचा शपथविधी सोहळा : सोनिया गांधी , मनोहनसिंग , केजरीवाल , ममता ,देवेगौडा , चंद्राबाबू आदी मान्यवरांना निमंत्रण …

Advertisements
Advertisements
Spread the love

महाविकास आघाडीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुंबईत दादर येथील शिवतीर्थावरआयोजित  सोहळ्यात शपथ घेणार असून या सोहळ्याला उपस्थित राहण्यासंदर्भात काँग्रेसनेत्या  सोनिया गांधी, मनमोहनसिंग , दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक मान्यवरांना निमंत्रणे पाठविणायत आली आहेत. यापैकी आ. आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच सोनिया गांधी आणि मनमोहनसिंग यांची भेट घेऊन त्यांना शपथविधी सोहळ्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे.

Advertisements

एकीकडे राज्याच्या शपथविधीचा तयारी आणि सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू असतानाच आदित्य ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन  रात्री साडेनऊच्या सुमारास ते थेट सोनिया गांधी यांच्या ‘१० जनपथ’ या निवासस्थानी  जाऊन त्यांना  शपथविधी सोहळ्याचं आग्रहाचं निमंत्रण दिलं. हे आमंत्रण सोनिया यांनी स्वीकारलं आहे. आदित्य यांच्यासोबत मिलिंद नार्वेकरही होते. सोनिया शपथविधी सोहळ्याला येणार की नाहीत, हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. सोनिया यांच्या भेटीनंतर आदित्य यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचीही भेट घेऊन त्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिलं.

Advertisements
Advertisements

महाआघाडीचे  नेते उम्हणून द्धव ठाकरे गुरुवारी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्धव ठाकरे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत. हा शपथविधी सोहळा भव्यदिव्य व ऐतिहासिक ठरावा, यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं आहे. यात काँग्रेसशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलुगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासह विविध मान्यवरांचा समावेश आहे. या सर्व मान्यवरांना निमंत्रणं धाडण्यात आल्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आग्रहाचं निमंत्रण देण्यासाठी आदित्य ठाकरे तडक दिल्लीत दाखल झाले. सोनियांची भेट घेतल्यानंतर आदित्य यांनी मोजक्याच शब्दांत प्रतिक्रिया दिली. सोनिया गांधी आमच्या आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांना शपथविधीला निमंत्रित करण्यासाठी मी येथे आलो आहे. मी त्यांना निमंत्रित केलं व त्यांचे आशीर्वाद घेतले, असे आदित्य यांनी नमूद केले.

आपलं सरकार