Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad News Update : नक्षत्रवाडीत १५ विजचोरांवर महावितरणची कारवाई

Spread the love

वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने औरंगाबाद शहरात सुरू केलेल्या धडक मोहिमेत १५ जणांवर कारवाई करण्यात आली. थकबाकीसाठी वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित केलेला असताना हे ग्राहक वीज चोरून वापरात असल्याचे उघडकीस आले आहे.

महावितरणच्या छावणी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शंकर चिंचाणे, नक्षत्रवाडी शाखेचे सहायक अभियंता योगेश जाधव, छावणी उपविभागाच्या सहायक अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) कठाळे, जनमित्र रेंगे, शेजूळ, काकडे आदींनी पैठण रोडवरील विविध वसाहतींमध्ये पाहणी केली. नक्षत्रवाडी परिसरातील हिंदुस्थान आवास या वसाहतीत १५ ग्राहकांनी महावितरणच्या फीडर पिलरमध्ये वायर टाकूनवीजचोरी केल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. वीजबिलाची थकबाकी असल्याने यातील काही ग्राहकांचा वीजपुरवठा सहा महिन्यांपूर्वी तर काहींचा वर्षभरापूर्वी कायमस्वरूपी खंडित केलेला आहे. महावितरणने त्यांचे मीटरही काढून आणलेले आहे. असे असतानाही वीजचोरी करून त्यांनी महावितरणचे आर्थिव्ाâ नुकसान केले. त्यामुळे या ग्राहकांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत महावितरणने दिले आहेत. या सर्व ग्राहकांना वीजचोरीची बिले देण्यात देण्यात येणार असून, ही बिले त्यांनी मुदतीत भरणा न केल्यास त्यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!