Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : रविवारी मुख्यमंत्री – उद्धव ठाकरे यांच्या भेटीत ठरणार सत्ता वाटपाचे सूत्र आणि सोमवारी अमित शहा करणार शिक्कामोर्तब !!

Spread the love

भाजप-सेनेत वाद लावून आपला उल्लू सिद्ध करण्याची कुणी कितीही दिवास्वप्ने बघितली तरी काँग्रेसकडून सेनेला पाठिंबा मिळण्याची सुतराम शक्यता नसल्यानं  भाजप सेनेतील वादळ हे कपातील वादळ ठरणार असून रविवारी निर्णय घेऊन भाजप -सेना ५ तारखेला एकत्र येऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील असे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाही सोमवारी ५ नोव्हेंबरला मुंबईत येत असून याच दिवशी सत्ता स्थापनेचे सूत्र ठरविण्यात येणार आहे.

शेवटी गड्या आपली महायुतीच भली याच निर्णयावर शिवसेनेला यावे लागेल हे  वृत्त महानायक ऑनलाईनने आधीच दिले आहे. कारण शिवसेना हे जाणून आहे कि , १०५ आमदारांचे मोठे संख्याबळ भाजपकडे असल्याने अडीच-अडीच  वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला मोदी- शहा कधीही मेनी करणार नाहीत त्यामुळे उपमुख्यमंत्रीपद आणि सरकारातील महत्वाची खाती यावर हि अखेरची तडजोड होईल. दरम्यान जरी राज्यात सत्तेच्या नव्या समीकरणांची मांडणी शरद पवार करीत असले तरी त्यांच्या या कारवायांना काँग्रेसकडून साथ मिळणार नसल्याने त्यांना यात यश येणार नाही. दरम्यान काही प्रसार माध्यमांनी शरद पवार मुख्यमंत्री  होतील अशी आवई उठविली असली तरी त्यातही  फारसे तथ्य नाही.

मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या शरद पवार यांच्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्या पाहण्यासाठी गेलेले असून रविवारी हे दोन्हीही नेते मुंबईत परतल्यानंतर  रविवारी एकमेकांना भेटणार आहेत. दरम्यान ही कोंडी फुटावी यासाठी पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू होत्या आणि त्याला यश येईल अशी दाट शक्यता आहे.

दरम्यान भाजप -सेना नेत्यांची परस्परांच्या विरोधात केली जाणारे वक्तव्य आणि ऐकमेकांवर केली जाणारी टीका  केवळ सत्ता वाटपात आपल्याला योग्य वाटा मिळावा म्हणून जाणीवपूर्वक करण्यात येत आहेत. वास्तविक सत्ता वाटपाचा फॉर्म्युलाही तयार करण्यात आला असून या दोन नेत्यांच्या बैठकीत त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत . तर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उद्या रविवारी पावसाने नुकसान झालेल्या भागाच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी दौरा आटोपून सायंकाळी हे दोनही नेते मुंबईत येणार असून त्यानंतर दोघांमध्ये भेट होणार आहे. ही भेट कुठे होईल हे मात्र उघड झालेले नाही. दरम्यान भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे सोमवारी ५ नोव्हेंबरला मुंबईत येण्याची शक्यता असून त्याआधी सत्तावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!