Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak Health Point : आज ब्रेन स्ट्रोक दिवस , साडेचार तासाच्या आत उपचार मिळाले तर रुग्ण बारा होण्याची शक्यता अधिक

Spread the love

दर दोन सेकंदात एकाला ब्रेनस्ट्रोक होतो. साठ टक्के रुग्ण या आजारामुळे दगावतात. तर ३० टक्के रुग्णांना कायमचे अंपगत्व येते. भारतात दर मिनिटाला सहा लोकांना स्ट्रोक होतो. स्ट्रोक हा वाचविता येतो. त्यासाठी जीवनशैलीत बदल करून योग्य काळजी घेतली तर हा आजार दूर ठेवता येतो, हे जागतिक स्तरावर केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.

मेंदूशी निगडीत व्याधींवर जागृती करण्यासाठी जगभर २९ ऑक्टोबर ब्रेन स्ट्रोक दिवस म्हणून पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर साधलेल्या संवादात डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी या अभ्यासाला दुजोरा देताना सांगितले, जगभर स्ट्रोकला मृत्यूचे तिसरे कारण म्हटले जाते. अपंगत्व येण्यासाठी हा आजार पहिले कारण ठरतो. स्ट्रोक आल्यावर मेंदूचा जो भाग खराब होतो. शरीराचा तो भाग निकामी होतो. स्ट्रोकचे लक्षणे ओळखण्यासाठी त्या व्यक्तीचा चेहरा, हात आणि बोलणे बघावे. आणि तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. स्ट्रोकच्या रुग्णाला साडेचार तासाच्या आत उपचार मिळाले तर तो बरा होण्याची खूप जास्त शक्यता असते. ५० ते ७० टक्के रुग्ण हे आपले दैनंदिन कार्य करू शकतात. अटॅक आल्यानंतर ९० दिवसाच्या आत रुग्णाला फिजिओथेरेपी देणे आवश्यक आहे. वय झाल्यानंतरच अर्धांगवायूचा झटका येतो असेही नाही. स्ट्रोक झालेल्या २० टक्के रुग्णांचे वय हे चाळीस वर्षाच्या खाली आहे. सहापैकी एका व्यक्तीला अकाली असे आजार होताहेत. त्यामुळे यांना दूर ठेवायचे असेल तर व्यसनांचा त्याग करून जीवनशैली सुधारणे आवश्यक आहे.

अशी आहेत लक्षणे

-डोकेदुखी ,डोकेदुखीसह उलटी होणे, शरीराचे संतुलन बिघडणे, कमी दिसण्याचा त्रास, पक्षघाताचा भास होणे, ब्रेन स्ट्रोक विषयी, जगातल्या अकाली मृत्यूचे तिसरे मोठे कारण, निम्याहून अधिक रुग्ण अपंग , गेल्या २५ वर्षांत ब्रेनस्ट्रोक रुग्णांत चिंताजनक वाढ, दर दोन सेकंदात एकाला मेंदूघात, १० कोटी ७० लाख रुग्ण दरवर्षी बाधीत, त्यापैकी जेमतेम ६ कोटी जगतात, पक्षाघाताचे ८० टक्के रुग्ण दारिद्र्य रेषेखालील भारतात ब्रेनस्ट्रोकचे प्रमाण २० टक्के

आपलं सरकार

Click to listen highlighted text!