Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आम आदमी पार्टीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर , ७ उमेदवारांचा समावेश

Spread the love

राज्यात २१ ऑक्टोबरला राज्याची विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टीने ५० जागा लढविण्याचा निर्णय घेतला  असून आज आपने ७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. याआधी आपने ८ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आतापर्यंत १५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

आज जाहीर करण्यात आलेल्या ७ उमेदवारांपैकी मऱाठवाड्यातील एक, कोकणमधील २, पश्चिम महाराष्ट्रातील ३, उत्तर महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. मराठवाड्यातील जालना मतदारसंघातून कैलास फुलारी, मीरा रोडमधून नरेंद्र भांबवानी, शिवाजी नगर (पुणे) मधून मुकुंद किर्दत , बडगावंशरी (पुणे) मधू गणेश धमाले, मध्य सोलापूरमधून अॅड. खतील वकील, नंदूरबारमधील नवापूरमधून डॉ. सुनील गावित, मुंब्रा-कळवामधून डॉ. अल्तामाश फैजी यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!