Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : डोनाल्ड ट्रम्प यांनी “भारताचे राष्ट्रपिता ” म्हणून मोदींचा केलेला सन्मान ज्यांना मान्य नाही ते ‘भारतीय’ नाहीत : केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह

Spread the love

‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘फादर ऑफ इंडिया’ असा केलेला गौरव ज्यांना आवडले नाही , ते भारतीय म्हणवून घ्यायच्या पात्रतेचेच नाहीत,’ अशी  टीका केंद्रीय मंत्री जितेंद्रसिंह यांनी केली आहे.


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘फादर ऑफ इंडिया’संबोधल्यानंतर  भारतात तीव्र  प्रतिक्रिया उमटत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मोदींच्या सन्मानाला विरोध करणाऱ्यांवर भाजचे नेते, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी जोरदार टीका केली आहे. ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘फादर ऑफ इंडिया’ अर्थात राष्ट्रपिता म्हणून केला. मात्र, अनेकांना ही गोष्ट रुचलेली नाही.


नेमके काय म्हणाले होते ट्रम्प…. ?

मोदींची स्तुती करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते कि “ भारताची हालत पूर्वी खूपच खराब होती. जर्जर होती.  परंतु नरेंद्र मोदी यांनी नवीन भारताला समृद्ध बनविण्यासाठी उत्कृष्ट कार्य केले. त्यांच्या आधी भारत एक एक दयनीय देश म्हणून मी मनात होतो. प्रधानमंत्री मोदी यांनी दहशतवादाविरुद्ध दिलेली लढाई प्रशंसनीय आहे . एका पित्याप्रमाणे त्यांनी देशाला एकजूट केले आहे. म्हणून त्यांना आम्ही आता भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखणार आहोत. ”


जितेंद्र सिंह  टपाल खात्याच्या एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.  यावेळी बोलताना ते म्हणाले कि , ‘भूतकाळात जगभरामध्ये भारताला क्वचितच जो सन्मान मिळत होता, तो सन्मान आता मिळतो आहे. भारताबाहेर राहणाऱ्या प्रत्येकाला आज भारतीय असल्याचा विशेष अभिमान वाटतो आहे. पंतप्रधान मोदी यांचे कार्य आणि कर्तृत्व यांच्यामुळेच आज हे घडते आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणणे अगदी योग्य आणि समर्पक असेच आहे.’

‘अमेरिकेच्या यापूर्वीच्या कोणत्याही अध्यक्षाने भारताच्या पंतप्रधानांबद्दल अशा पद्धतीने उल्लेख केल्याचे दाखले किंवा पुरावे सापडत नाहीत,’ असे स्पष्ट करून ते म्हणाले कि ,  ‘डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी यांचा जो गौरव केला आहे, त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे. राजकीय मतभिन्नता आणि वैचारिक विश्व बाजूला ठेवून या वक्तव्याचे स्वागत केले पाहिजे,’ असा सल्ला सिंह यांनी दिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!