Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विधानसभेची आचार संहिता सुरु होत नाही तोच आडम मास्तरांची प्रणिती शिंदे यांच्या विरोधात पहिली तक्रार

Spread the love

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची पहिली तक्रार दाखल करण्यात आली आहे. माजी आमदार नरसय्या आडम यांनी हा आरोप केला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स वाटल्याची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे.

निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा केली. तरीही प्रणिती शिंदे यांचे कार्यकर्ते दुपारी साडेबाराच्या सुमारास सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात मेकअप बॉक्स वाटत होते असा आरोप आडम यांनी केला. मतदारांना मेकअप बॉक्स देऊन प्रणिती शिंदे यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे असे म्हणत आडम यांनी यासंदर्भातली तक्रार जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी आपण या प्रकरणी चौकशी करु, काही तथ्य आढळले तर कारवाई करु असे आश्वासनही दिले. आडम मास्तर यांनी लेखी तक्रार देण्यास मी सांगितलं आहे. पोलिसांमार्फत आपण याप्रकरणी कारवाई करु असं राजेंद्र भोसले यांनी म्हटलं आहे. टीव्ही नाईन मराठीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

प्रणिती शिंदे म्हणतात खोटा आरोप 

नरसय्या आडम यांनी केलेल्या तक्रारीनंतर आणि आरोपानंतर प्रणिती शिंदे यांनीही यावर भाष्य केलं. ” आडम मास्तर यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. केवळ स्टंटबाजी म्हणून आडम मास्तर यांनी कॅमेरासमोर माझ्यावर आरोप केले आहेत. ” असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात सध्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे प्रतिनिधीत्त्व करतात. माकपचे माजी आमदार आणि कामगार नेते नरसय्या अडाम यांचा त्यांनी मागच्या निवडणुकीत पराभव केला. त्यानंतर २०१४  मध्ये मोदी लाट असतानाही प्रणिती शिंदे निवडून आल्या. आता माझ्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा खोटा आरोप केला जातो आहे असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!