उर्मिला मातोंडकर पाठोपाठ कृपाशंकर यांचाही राजीनामा , मिलिंद देवरा यांनी केले संजय निरुपम यांना लक्ष

Spread the love

काँग्रेसच्या लोकसभेतल्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या राजीनाम्यापाठोपाठ काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे.  पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे.  राजीनामा दिल्या नंतर कुठल्या पक्षात जायचं याचा निर्णय येत्या काही दिवसांमध्ये घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कृपाशंकर सिंग हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.

Advertisements

भाजपमध्ये उद्या पुन्हा एकदा मेगाभरती होणार आहे. यात हर्षवर्धन पाटील, आनंदराव पाटील, सत्यजित देशमुख आणि नवी मुंबईतले नेते गणेश नाईक यांचा समावेश आहे. यातील काही प्रवेश हे मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लब इथे होणार आहे.

आजच काँग्रेसच्या लोकसभेतल्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनीही राजीनामा दिला होता. त्यानंतर हा काँग्रेसला दुसरा धक्का आहे. आघाडी सरकारमध्ये गृह राज्यमंत्री मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष तसंच राज्यातील काँग्रेसच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांवर सिंग यांनी कामं आहे. संजय निरुपम यांच्या मुंबई अध्यक्षपदाचे नियुक्तीनंतर काँग्रेसमध्ये ते पक्षात अस्वस्थ होते. गेली दोन वर्ष मुख्यमंत्री गणपतीचे निमित्ताने यांच्या घरी आवर्जून हजेरी लावत होते. याच माध्यमातूनं ते मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधत होते. त्याचबरोबर सिंग हे भाजपातील दिल्लीतील अनेक ज्येष्ठ नेत्यांशी उत्तर भारतीय म्हणून संपर्कात राहिलेत.

दरम्यान उर्मिला मातोंडकर यांच्या राजीनाम्यावरून आता मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्यात जुंपली आहे. मिलिंद देवरा यांनी ट्विट करुन उर्मिला मातोंडकर यांनी योग्यच गोष्टी मांडल्या आहेत असं म्हटलं आहे. काँग्रेसचा मुंबई अध्यक्ष म्हणून मी उर्मिला मातोंडकर यांना पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यांनी उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. मात्र उर्मिला मातोंडकर यांना ज्यांनी पक्षात आणले त्यांच्यामुळेच त्यांनीच अंतर्गत राजकारण सुरु केले. मुंबई उत्तर भागातल्या नेत्यांनाच उर्मिला मातोंडकर यांच्या राजीनाम्यासाठी जबाबदार धरलं पाहिजे असं ट्विट मिलिंद देवरा यांनी केली आहे. त्यामुळे नाव न घेता त्यांनी संजय निरुपम यांनाच उर्मिला मातोंडकर यांच्या राजीनाम्यासाठी जबाबदार धरलं आहे हे स्पष्ट होतं आहे. कारण संजय निरुपम यांच्या उपस्थितीतच उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्थानिक नेत्यांमुळेच माझा पराभव झाला असा मजकूर असलेलं पत्र उर्मिला मातोंडकर यांनी लिहिलं होतं. १६ मे रोजी लिहिलेल्या या पत्राची दखल घेतली गेली नाही.

“आपण अनेकदा नाराजी व्यक्त केली परंतु त्याची कोणीही दखल घेतली नाही. पक्षांतर्गत राजकारणात आपल्याला कोणताही रस नाही. तसंच राजकारणासाठी आपला वापर होऊ नये यासाठी आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत”, असं म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.

 

Leave a Review or Comment

आपलं सरकार