ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित

Advertisements
Advertisements
Spread the love

ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. रवीश कुमार यांच्याबरोबर म्यानमारचे को स्वे विन, थायलंडचे अँगखाना नीलापैजित, फिलिपाइन्सचे रेमुणडो पुंजान्ते कायाब्याब आणि दक्षिण कोरियाच्या किम जो की यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा आशियाचा नोबेल पुरस्कार मानला जातो. रवीश कुमार एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक आहेत.

Advertisements

सुरुवातीपासूनच रवीश कुमार यांचा कल वास्तववादी वार्तांकन करण्याकडे  राहिला आहे. सर्वसामान्यांचे सहसा प्रसारमाध्यमांकडून दखल न घेतले जाणारे प्रश्न मांडणे यावर त्यांचा भर राहिला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, भारतीय प्रसारमाध्यमे सध्या कठीण काळातून जात आहेत. अशी परिस्थिती केवळ योगायोगाने आलेली नाही, तर ती टप्प्याटप्प्याने आणि नियोजित पद्धतीने आलेली आहे. या कठीण काळाचे मूल्यमापन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार