Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राज्याचे १९ वे राज्यपाल म्हणून भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली मराठीतून शपथ

Spread the love

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. कोश्यारी हे १९वे राज्यपाल असून त्यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी कोश्यारी यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती यांच्या आदेशाचे वाचन केले. राज्यपालांचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी यांचा जन्म १७ जून १९४२ रोजी झाला. त्यांनी उत्तरप्रदेशातील राजा इंटर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. परवत पियूष या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते. कोश्यारी हे ३० ऑक्टोबर २००१ ते १ मार्च २००२ या कालावधीत उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राज्यसभा खासदार, लोकसभा खासदार म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. याशिवाय त्यांनी विविध शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात कामे केली आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!