Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : काश्मीरमधील कलम-३७० हटविल्यानंतर शहरात पोलिसांचा खडा पहारा

Spread the love

विविध भागात पोलिसांचे फिक्स पॉईट तैनात

औरंंंगाबाद : जम्मू-काश्मीरमधील कलम-३७० हटविल्यानंतर शहरात कोणताही तणाव निर्माण होवू नये यासाठी शहर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहराच्या संवेदनशील भागात पोलिसांचे फिक्स पॉईन्ट लावण्यात आले असून शहरातील प्रत्येक घडामोडीवर पोलिस लक्ष ठेवून असल्याची माहिती पोलिस उपायुक्त मिना मकवाना यांनी मंगळवारी (दि.६) दिली.
जम्मू-काश्मीरमधील कलम-३७० आणि कलम ३५-अ हटविण्याचा ऐतिहासीक विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. त्यानंतर देशभरात भाजपच्या कार्यकत्र्यांनी जल्लोष केला. या सर्व पाश्र्वभूमीवर शहरात कोणताही तणाव निर्माण होवून शहराच्या शांततेला बाधा पोहचू नये यासाठी पोलिसांकडून तसेच गुप्तचर संस्थाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. शहराच्या विविध भागात गुन्हे शाखा, विशेष शाखा, स्थानिक पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांची गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच शहर वाहतूक शाखा पोलिसांच्या वतीने देखील विविध भागात नाकाबंदी करून संशयीत वाहनांची तपासणी करण्यात येत असल्याचे मकवाना यांनी स्पष्ट केले.
शहरात कायदा-सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून शहराच्या विविध भागात फिक्स पॉर्इंन्ट तैनात करण्यात आले आहेत. तसेच सिटीचौक, शहागंज, सिल्लेखाना, बुढ्ढीलेन, बेगमपुरा, जटवाडा रोड, हर्सुल, नारेगांव, सिडको, आझादचौक, बालाजीनगर, जयभवानीनगर चौक, पंढरपुर, रांजणगांव आदी विविध भागात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून सोबतच जागोजागी नाकाबंदी करून संशयीत वाहनांची व व्यक्तींची चौकशी करण्यात येत असल्याचे मकवाना यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!