Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भुजबळ नाही म्हणाले तरी त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाची चर्चा आणि त्यांच्या विरोधातील पोस्टरबाजीचे पाठीराखे कोण ?

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री  छगन भुजबळ यांची  शिवसेनेत परतण्याची चर्चा सुरु असली तरी  छगन भुजबळ पुन्हा शिवसेनेत आले तर सध्या असलेल्या नेत्यांना त्यांच्या हाताखालील काम करावे लागेल. कारण त्यांच्या एवढा वरिष्ठ नेता शिवसेनेत सध्यातरी नाही. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या घर वापसीला शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे  या त्रिकुटाने विरोध दर्शविला असल्याचे वृत्त आहे.

मुळात भुजबळ यांच्या प्रवेशावरून नाशिकमधील शिवसेनेचा चेहरा असलेला आणि विद्यमान राज्यमंत्री दादा भुसे यांनी नाराजी दर्शविली आहे . या सर्वांच्या विरोधामुळेच काही महिन्यांपूर्वी ग्रीन सिग्नल मिळालेले  छगन भुजबळ सध्या  वेटिंगवर आहेत मात्र  त्यांच्याकडून आपण शिवसेनेत जाणार नाही असा खुलासा त्यांनी स्वतः केला असला तरी त्याची कारणे वेगळी असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवेसेना सोडून गेलेल्यांना तर आता आपण जवळही करायला नको. त्यात छगन भुजबळ यांच्या सारखा नेता ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, उत्पन्नापेक्षा अमाप संपत्ती असल्याचे तसेच मनी लॉड्रिंगचे आरोप झालेले असल्याने ते पक्षासाठी डोकेदुखी ठरू शकतात. विरोधी पक्षाला प्रचारात हे आयत कोलीतच मिळू शकतं, असा सूर तिघांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे लावल्याचे समजते . यातून छगन भुजबळ पक्षात आल्यानंतर सध्याच्या नेत्यांपेक्षा त्यांना राजकारणाची जास्त जाण आहे. शिवसेनेतून फुटून गेलेल्या नारायण राणे यांच्याच ताकदीचा नेता सध्या भुजबळच असल्याने त्यांचा पक्षातील प्रवेश हा थेट मातोश्रीच्या कोअर कमिटीतच होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग होईल, या भीतीपोटी या तिनही नेत्यांचा  छगन भुजबळ यांच्या प्रवेशाला छुपा विरोध असल्याची चर्चा असली तरी अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील असे बोलले जात आहे.

दरम्यान  छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास शिवसैनिकांनी कट्टर विरोध केला आहे. आज सकाळपासून बोरिवली-दहिसर भागात भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देण्यावरून एक कट्टर शिवसैनिक म्हणून विरोध असल्याचे फलक लागले आहेत. सध्या हे लागलेले फलक बोरिवली व दहिसरकरांमध्ये चर्चेचा विषय बनला असून, रस्त्यावरून जाणारे येणारे नागरिक हा फलक आवर्जून वाचत असल्याचे चित्र आहे. आदरणीय शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या लखोबा लोखंडेची शिवसेनेला गरजच नाही! ह्या “भुजात” “बळ”नसलेल्या गद्दाराला शिवसेनेत पुन्हा प्रवेश देण्याची पत्रताच नाही, एक कट्टर शिवसैनिक असे फलक बोरिवली व दहिसरमध्ये लागले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!