Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गांजाची तस्करी करणारे चौघे गजाआड, ४८ किलो गांजा जप्त, पुंडलिकनगर पोलिसांची कारवाई

Spread the love

गांजाची तस्करी करणा-या चार जणांना पोलिसांनी मंगळवारी (दि.१६) पहाटे सापळा रचून गजाआड केले. पोलिसांनी गाजांची तस्करी करणा-यांच्या ताब्यातून ४ लाख ६० हजार रूपये विंâमतीचा ४८ किेलो गांजा व व ३ लाख रूपये विंâमतीची एक कार असा एवूâण ७ लाख ६० हजार रूपये विंâमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलुमल्ली दुर्गाप्रसाद अप्पाराव (वय ३०, रा.तुर्ग गोदावरी, आंधप्रदेश), दुर्गेन रॉमेन लक्ष्मण (वय २२), कोसूरी सतीश पट्टराव (वय ३५), दोघे रा.राज कुलमंडी, आंध्रप्रदेश, केडमी राकेश अप्पाराव (वय १९, रा.नेसल्लीपट्टम, आंध्रप्रदेश) असे अटक केलेल्या गांजा तस्करांची नावे आहेत. हैदराबाद येथून पुण्याला दोन जण कारमधुन गांजा घेवून जात असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे उपनिरीक्षक विकास खटके यांच्या पथकाने बीड बायपास रोडवरील झाल्टा फाटा अंबिका हॉटेल समोर सापळा रचला होता.खब-याने दिलेल्या माहितीनुसार आलेली कार पोलिसांनी थांबवून कारची झडती घेतली असता, कारमध्ये ४८ किलो गांजा मिळून आला. गांजाची तस्करी करणाNया चौघांनी ११ पिशव्यामध्ये गांजा भरून तो कारच्या सिटखाली आणि डीक्कीमध्ये दडवून ठेवला होता. गांजाची तस्करी करणाNया चौघाविरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेस पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्यासह, सहाय्यक आयुक्त रामचंद्र गायकवाड, पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके आदींची उपस्थिती होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!