Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 : संविधान जिंदाबाद !! खासदार शफीकुर रहेमान बर्क यांनीही दिले ” जय श्रीराम ” आणि ” वंदेमातरम” ला उत्तर

Spread the love

17 व्या लोकसभेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं. लोकसभा नवीन असल्याने सुरुवातीला सर्व सदस्यांचा शपथविधी सध्या सुरू आहे. पहिल्या दिवशी 300 पेक्षा जास्त सदस्यांनी शपथ घेतली. आज दुसऱ्या दिवशीही सदस्यांचा शपथ घेण्याचा क्रम सुरूच होता. प्रत्येक सदस्याची शपथ घेण्याची तऱ्हा ही वेगळी असते. अनेक सदस्यांनी आपल्या मातृभाषेत आणि राज्याच्या वेशभुषेत शपथ घेतली. अनेकांनी वेगवेळ्या घोषणा दिल्या. समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातले खासदार शफीकुर रहेमान बर्क हे शपथ घेत असताना ‘वंदे मातरम् ‘च्या घोषणा दिल्या गेल्या. बर्क यांनी त्या घोषणांना आक्षेप घेत आपण अशी घोषणा देणार नसल्याचं सांगितलं. ते म्हणाले, वंदे मातरम् म्हणणं हे इस्लामविरोधी आहे. त्यामुळे मी ते म्हणणार नाही.

असादुद्दीन ओवेसी यांचेही जय भीम …

MIMचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी शपथ घेतली. ओवेसी शपथ घेण्यासाठी येत असतानाच भाजपच्या सदस्यांनी भारत ‘माती की जय’ आणि ‘वंदे मातरम’चे नारे लावले. भाजपच्या सदस्यांची घोषणाबाजी सुरू असताना ओवेसी यांनीही हातवारे करत आणखी मोठ्याने घोषणा द्या, असं हातानेच सुचवलं. त्यांनी उर्दुतून आणि ‘खुदा’ला स्मरून शपथ घेतली. शपथ झाल्यावर त्यांनी, जय भीम, तकबीर, अल्ला हु अकबर आणि जय हिंद अशी घोषणा दिली. पहा बातमी

संसदेत असदुद्दीन ओवैसी यांचे ” जय श्रीराम” च्या घोषणांना ” एक लोहार कि ” स्टाईल उत्तर !! बघा आणि पहा काय घोषणा दिल्या ?

आपलं सरकार

Click to listen highlighted text!