It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

बालकांचे धाडस ! १४ वर्षाच्या मुलाने बिबट्याशी लढा देत वाचवला सात वर्षाच्या भावाचा जीव !!

Advertisements

<SCRIPT charset=”utf-8″ type=”text/javascript” src=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=GetScriptTemplate”> </SCRIPT> <NOSCRIPT><A rel=”nofollow” HREF=”//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?rt=tf_cw&ServiceVersion=20070822&MarketPlace=IN&ID=V20070822%2FIN%2F19840a8-21%2F8010%2F637dff1b-7428-4e7b-82fe-5ee3099bc298&Operation=NoScript”>Amazon.in Widgets</A></NOSCRIPT>

Spread the love

ठाण्यातील मुरबाड तालुक्यात अंगावर शहारे  आणणारी ही घटना घडली आहे. १४ वर्षाच्या मुलाने बिबट्याशी लढा देत आपल्या सात वर्षांच्या चुलत भावाचा जीव वाचवला आहे. मुलाने भावाला अक्षरक्ष: मृत्यूच्या जबड्यातून ओढून आणत जीवनदान दिलं.  ही घटना समोर आल्यानंतर मुलाच्या धाडसाचं कौतुक होत आहे. दरम्यान पोलिसांनी धाडस दाखवत भावाचा जीव वाचवणाऱ्या नरेशचा सत्कार केला आहे. इतक्या लहान वयात मुलाने दाखवलेल्या धाडसाचं करावं तितकं कौतुक कमीच आहे अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे.

शुक्रवारी संध्याकाळी नरेश (१४) आणि चुलत भाऊ हर्षद (७) आपल्या आजीसोबत शेतात गेले होते. आजी शेतात व्यस्त असताना दोघेही जांभळांच्या शोधात निघाले. यावेळी बिबट्या एका घनदाट ठिकाणी लपून बसला होता. त्याने उडी मारुन नरेशवर हल्ल्याचा प्रयत्न केला. पण नरेश बाजूला झाल्याने त्याने हर्षदवर हल्ला करत त्याला जखमी केला. यावेळी नरेशने धाडस दाखवत काही दगड उचलले आणि तेथे पडलेली एक काठी उचलून बिबट्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. नरेशने केलेल्या हल्ल्यामुळे बिबट्याची हर्षदवरील पकड सैल पडली.

Advertisements


Advertisements

दोघा मुलांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केल्याने त्यांची आजी हातात कोयता घेऊन धावत तिथे पोहोचली. यावेळी बिबट्याने तेथून पळ काढला. आजीने दोन्ही मुलांना घेऊन रुग्णालय गाठलं. तिथे दोघांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांनी वनविभागाला बिबट्या घटनास्थळापासून ३०० मीटर अंतरावर मृतावस्थेत आढळला. मादी बिबट्या १० ते १२ वर्षांची होती. शवविच्छेदनासाठी मृतदेह संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये नेण्यात आला आहे. बिबट्याच्या शरिरावर कोणत्याही जखमा नाहीत.