Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजस्थानच्या न्यायालयात गाय का आणली गेली ? बघा तर खरं !!

Spread the love

गायीच्या मालकी हक्कावरून जोधपूर जिल्ह्यातील एका सत्र न्यायालयात मोठा चर्चेचा विषय बनला आहे. एका प्रकरणात सुनावणीदरम्यान चक्क गायीला कोर्टात आणावे लागले. गेल्या वर्षभरापासून या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू होती. अखेर कोर्टाने निकाल देत ही गाय एका व्यक्तीकडे सोपवली व वाद संपुष्टात आला. एका गायीवर दोन जणांनी मालकी हक्क सांगितल्याने हा वाद कोर्टात पोहोचला. वर्षभर सुरू असलेल्या या वादावर अखेर काल पडदा पडला. ओम प्रकाश आणि श्याम सिंह या दोन व्यक्तींनी एकाच गायीवर आपला मालकी हक्क सांगितला होता. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतरही वाद संपला नव्हता. अखेर दोघांनीही कोर्टात धाव घेतली. वर्षभरानंतर हा वाद शुक्रवारी संपुष्टात आला.

शुक्रवारी या गायीला कोर्टात आणावे लागले. दोन्ही पक्षांच्या वकिलांनी कोर्टात पुरावे सादर केले. न्यायाधीशाने पुरावा पाहून ही गाय ओम प्रकाश यांच्याकडे सोपवली. दरम्यान, या गायीचा वाद कोर्टात पोहोचण्याआधी एकाने हा दावा केला की, ही गाय स्वतः दूध पितेय. सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या मंडोल गोशाळेत या गायीला ठेवण्यात आले होते. परंतु, सीसीटीव्हीत गाय दूध पित असल्याचे दिसले नाही. त्यानंतर हा वाद कोर्टात पोहोचला होता. कोर्टाने निकाल दिल्यानंतर हा वाद संपुष्टाच आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!