Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दहावीचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी , एकुण टक्के वारीत मात्र झाली घट !!

Spread the love

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा निकालाचा टक्का कमालीचा घसरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या १२.३१ टक्क्यांनी कमी आहे. गेल्या काही वर्षांची परंपरा कायम राखत यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे, ८८.३८ टक्के लागला आहे. राज्यातील तब्बल १७९४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

निकालाची विभागनिहाय टक्केवारी खालीलप्रमाणे:

पुणे : ८२.४८
नागपूर: ६७.२७
कोकण : ८८.३८
औरंगाबाद : ७५.२०
मुंबई – ७७.०४
कोल्हापूर – ८६.५८
अमरावती – ७१.९८
नाशिक – ७७.५८
लातूर – ७२.८७

दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना त्यांचे गुण ऑनलाइन पाहता येणार आहेत.

या वेबसाइटवर पाहा निकाल:

mahresult.nic.in

maharashtraeducation.com

mahahsscboard.maharashtra.gov.in

आपलं सरकार

Click to listen highlighted text!