Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

West Bengal : ममता बॅनर्जींना पाहून भाजप समर्थकांनी दिल्या ” जय श्रीराम ” च्या घोषणा

Spread the love

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जय श्रीरामच्या घोषणांनी चांगलेच टांग केले आहे . आज असे झाले कि त्या नॉर्थ २४ परगणा या ठिकाणाहून जात असताना स्त्यावरच्या काही लोकांनी त्यांच्या गाड्या पाहून जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.  या घोषणा ऐकून ममता बॅनर्जी यांचा संताप अनावर झाला. त्या कारमधून उतरल्या आणि त्यांनी घोषणा देणाऱ्यांना थेट आव्हान दिलं. तसेच हे सगळे पश्चिम बंगालमधले लोक नाहीत तर बाहेरून आलेले भाजपाचे लोक आहेत असाही आरोप त्यांनी केला. हे सगळे गुन्हेगार आहेत आणि माझ्याबाबत ते अपशब्द वापरत आहेत असाही आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. हे लोक बंगालमधले असूच शकत नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. अत्यंत संतापात त्या तातडीने कारमध्ये बसून पुढे निघून गेल्या. मात्र घोषणा देणाऱ्यांविरोधात कारवाई करू असे त्यांनी जाता जाता प्रसारमाध्यमांना सांगितले. एएनआयने या संदर्भातला एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान जय श्रीराम या घोषणांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. भाजपाने प्रभू रामचंद्रांच्या नावाचं राजकारण केलं आहे. निवडणुका आल्या की भाजपाला रामाची आठवण येते असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. तर प्रभू रामचंद्रांच्या नावाने दिलेल्या घोषणा ममता बॅनर्जी यांना चालत नाहीत मात्र मी त्या देणारच हिंमत असेल तर ममता बॅनर्जी यांनी मला अटक करून दाखवावी असं आव्हान भाजपा नेते अमित शाह यांनी दिलं होतं. या सगळ्यावरून निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकारण चांगलंच रंगलं होतं. पश्चिम बंगालमध्ये काही प्रमाणात हिंसाचारही उसळला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!