सगोत्री विवाह केल्याने मुलीच्या भावांनी तरुणावर घातल्या गोळ्या…पण हातावर निभावले !!

Advertisements
Advertisements
Spread the love

दिल्लीतील एका २५ वर्षीय पॉवर लिफ्टर तरूणास मुलीच्या कुटूंबीयांच्याविरोधात जाऊन सगोत्री विवाह करणे महागात पडले. त्याने असे केल्यामुळे बुधवारी रात्री तो घरी जात असताना त्याला अडवून, मुलीच्या भावांनी त्याच्यावर गोळी झाडत त्याला मारहाण केली. सुदैवाने गोळी त्याच्या हातालाच लागल्याने  तो केवळ गंभीर जखमी झाला.

Advertisements

बॉबी सिंग असे या तरूणाचे नाव आहे. त्याने सांगितले की, मी माझ्या खेळात भारताचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. मात्र आता माझ्या उजव्या हाताच्या कोपराला गोळी लागल्याने मला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून प्रकृती सध्या स्थिर आहे. ही घटना येथील उत्तम नगर परिसरात बुधवारी रात्री १०.३० वाजता घडली. नोव्हेबर २०१८ मध्ये लग्न केल्यानंतर हे जोडप पश्चिम दिल्लीत राहायला आल आहे. पोलीस उप आयुक्त अल्फान्सो यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, हल्लेखोर नितीन व नीरज हे मुलीचे भाऊ आहेत. या घटनेनंतर दोघेही फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार