Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

श्रीरामपूरमध्ये प्रभारी मुख्याध्यापिकेची आत्महत्या, दोघांची पोलिसांकडून चौकशी

Spread the love

श्रीरामपूर नगर पालिकेच्या शाळेत मुख्याध्यापिका पदावर कार्यरत असलेल्या अलकनंदा सोनवणे (वय ५०) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळले नसले तरी आत्महत्या करण्यापूर्वी शिक्षिकेने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत ‘दोन व्यक्ती’ चा नामोल्लेख केल्याने शहरात खळबळ माजली आहे. त्या दोन व्यक्तींनी छळ केला की, आणखी काही त्रास दिला होता, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, पोलिसांनी त्या दोन व्यक्तींची नावे सांगण्यास नकार दिल्याने प्रकरण दडपून टाकले जाणार तर नाही ना?, या चर्चेला उधाण आले आहे.

अलकनंदा सोनवणे या श्रीरामपूर नगरपालिकेच्या गोंधवणी शाळा क्रमांक ३ या शाळेत शिक्षिका होत्या. त्यांचेकडेच मुख्याध्यापक पदाचा पदभार होता. मंगळवारी शाळेचे कामकाज संपवून त्या आपल्या घरी दुपारी परतल्या. घरात गेल्यावर आतल्या खोलीत साडीने पंख्याला गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. बराचवेळ होऊनही मुलगी बाहेर आली नाही, म्हणून आई वडील पाहायला गेले, तेव्हा त्या मृतावस्थेत आढळल्या. मृत्युपूर्वी या शिक्षिकेने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात दोन व्यक्ती कडून छळ सुरू असल्याचे कारण नमूद केले. शिक्षिकेच्या आत्महत्येस जबादार असणाऱ्या ‘त्या’ नराधम व्यक्तींना पकडून त्यांचेवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी आणि श्रीरामपूरच्या नागरिकांनी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!