पक्षाकडून कानउघाडणी होताच, साध्वी प्रज्ञाची सपशेल माघार , म्हणाली पक्षाची भूमिका तीच माझी भूमिका

Advertisements
Advertisements
Spread the love

महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या साध्वी प्रज्ञाने पक्षाकडून कानउघाडणी होताच माघार घेतली असून ‘पक्षाची भूमिका तीच माझी भूमिका’, असा माफीचा सूर आळवला आहे. मक्कल निधी मय्यम पक्षाचे प्रमुख व अभिनेता कमल हासन यांनी नथुराम गोडसे हा स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिला दहशतवादी होता, असे विधान केले होते.

Advertisements

कमल हसन यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना साध्वी प्रज्ञाने हासन यांच्यावर निशाणा साधत ‘नथुराम गोडसे देशभक्त होते’, असे म्हटले होते. त्यावरून वादळ उठताच भाजपने साध्वीची स्पष्ट शब्दांत कानउघाडणी केली होती. साध्वींच्या या मताशी पक्ष सहमत नाही. त्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे व जाहीरपणे माफी मागावी, असे भाजपचे जीव्हीएल नरसिंह राव यांनी बजावले होते.

Advertisements
Advertisements

पक्षाच्या  तंबी नंतर साध्वीने आपले विधान मागे घेताना म्हटले आहे कि ,  ‘माझी माझ्या पक्षावर निष्ठा आहे. मी पक्षाची कार्यकर्ता आहे आणि पक्षाची जी भूमिका आहे तीच माझीही भूमिका आहे’, असे स्पष्टीकरण साध्वी प्रज्ञाने दिले आहे.

आपलं सरकार