Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

केरळमध्ये ४ जून रोजी मान्सून दाखल होतोय पण , मराठवाडा , विदर्भात कमी पावसाचा अंदाज

Spread the love

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना तसेच बळीराजाला आता मान्सूनची आस लागली आहे. त्यातच आता केरळमध्ये ४ जून रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात कमी पाऊस पडेल अशी शक्यताही स्कायमेटने वर्तवली आहे.

यावर्षी देशातील मान्सून अल निनोच्या प्रभावाखाली राहणार असल्याचे मतही स्कायमेटने व्यक्त केले आहे. तसेच जुलै महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आली आहे. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरिस केरळमध्ये मान्सून दाखल होतो. परंतु यावेळी केरळमध्येही 4 जून रोजी मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून लांबवणीवर जाण्याची शक्यता आहे. यातच कर्नाटक, महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेशातील आणि गुजरातमधील काही भागांमध्ये कमी पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. तसेच देशभरात सरासरीच्या 93 टक्के पाऊस पडेल, या अंदाजावर स्कायमेट ठाम आहे. तसेच बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये यावेळी कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!