आरक्षणावरून पेढे वाटणारे भाजपचे नेते कुठे आहेत ? राज ठाकरे यांचा सवाल

Advertisements
Advertisements
Spread the love

आरक्षणाचा निर्णय झाला तेव्हा पेढे वाटणारे भाजपाचे नेते आहेत कुठे आहेत असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला असून  मराठा तरूण-तरूणांना राज्य सरकारने फसवलं असल्याचा आरोप केला केला आहे . राज्यातल्या स्थानिक तरूणांना नोकरीची संधी मिळाली तर आरक्षणाची गरजच लागणार नाही असे बोलताना ठाकरे म्हणाले कि ,  राज्यातल्या मुला मुलींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच लागणार नाही. राज्यातल्या तरूणांची राज्य सरकारने  फसवणूक केली असा आरोपही  त्यांना केला आहे. आरक्षणाचा प्रश्न कोर्टात आहे त्यावरून राज्य सरकारने फसवणूक केली आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Advertisements

दुष्काळावरूनही राज ठाकरेंनी सरकारवर तोफ डागली आहे.  दुष्काळासाठी राज्य सरकारने काय केलं ते सांगावं. दुष्काळाची कामं केली तर मग दुष्काळ जाहीर का करावा लागला असे प्रश्न उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. दुष्काळाचा भीषण प्रश्न का निर्माण झाला? तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या असे प्रश्न राज ठाकरेंनी विचारले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.

Advertisements
Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राईकबाबत जे वक्तव्य केलं त्यावरून देशाची खिल्ली उडवली जाते असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. हल्ल्याआधीच्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो असा सल्ला मी दिला होता असं मोदींनी म्हटलं होतं. या वक्तव्यावरून जगभरात आपली खिल्ली उडवली जाते आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

एवढंच नाही जे चुकीचं सुरू आहे त्याबाबत बोललं गेलंच पाहिजे अशीही भूमिका राज ठाकरेंनी मांडली. मोदी सरकारविरोधात मी बोलतो आहे कारण त्यांनी कामं केली नाहीत. स्वप्न दाखवून त्यांनी भ्रमनिरास केला. जर कामं केली नाहीत तर कोणतंही सरकार असो त्याविरोधात बोललंच पाहिजे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या सरकारने कामं केली नसती तरीही मी हेच बोललो असतो. माझं सरकार आलं उद्या आणि मी चुका केल्या, फसवणूक केली तर माझ्याविरोधातही बोललं गेलंच पाहिजे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

आपलं सरकार