Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोण काय व्हायरल करेल याचा नेम नाही , आगाऊ चर्चा ” त्या ” दोन महिला मतदान कर्मचाऱ्यांची …

Spread the love

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सोशल मीडियावर कोण काय व्हायरल करेल याचा नेम सांगता येत नाही. एकीकडे जीवन मरणाच्या प्रश्नावर , जातीवर , धर्मावर गंभीर चर्चा चालू आहे , राजकीय नेते एकमेकांचा पण उतारा करण्यात गुंतले आहेत तर मतदार , काही पत्रकार आणि छायाचित्रकार विरंगुळा म्हणून भलतेच फोटो व्हायरल करण्यात गुंतले आहेत . तुमच्याही मोबाईलवर हा फोटो किंवा व्हिडीओ आलाच असेल किंवा पहिला तरी असेल आम्ही बोलत आहोत त्या दोन अतिशय व्हायरल झालेल्या फोटोविषयी आणि व्हिडीओ विषयी !!

निवडणुकीत मतदान कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अशाच दोन महिलांच्या फोटोंनी सध्या धुमाकूळ घातला आहे. सर्वात आधी पिवळ्या, लिंबू रंगाची साडी घातलेली महिला कर्मचारी झोतात आली नाही तोच आणखी एक निळ्या रंगांचा झगा घालून कर्तव्यावर निघालेली महिला कर्मचारी चर्चेचा विषय झाली आहे. प्रत्येक मोबाईलवर या दोन्हीही महिला कर्मचाऱ्यांनी स्थान मिळवले आहे. आणि अशा व्हायरल झालेल्या व्हिडीओचा आणि फोटोंचा शोध लावणार नाहीत ते पत्रकार कसले? त्यांनीही यामहिलांचा शोध घेऊन त्या कोण कुठल्या याचा शोध लावला आहे.

पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर सोशल मीडियावर पिवळ्या साडीतल्या महिला निवडणूक अधिकाऱ्याच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं  आणि आता दोन दिवसांपासून एका निळ्या ड्रेसमधल्या महिला निवडणूक अधिकाऱ्याचा फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पिवळ्या साडीतल्या या महिला अधिकाऱ्याचे दोन्ही हातात इव्हीएम घेऊन जातानाचे फोटो फेसबुक, व्हॉट्स अॅपवर शेअर होत होते. त्यांचं नाव नलिनी सिंहअसून त्यांच्या पोलिंग बूथवर १०० टक्के मतदान झाल्याचाही मेसेज व्हायरल होत होता. जयपूर येथील हे फोटो असल्याचीही चर्चा होती. पण या महिला अधिकाऱ्याचं खरं नाव पत्रकारांनी शोधून काढलं आणि सांगितलं कि , या मॅडम नलिनी सिंह नसून  तर रीना द्विवेदी आहेत. आणि त्या लखनऊच्या पीडब्ल्यूडी विभागात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत आहेत.  त्यांचे फोटो वृत्तपत्र छायाचित्रकार तुषार रॉय यांनी सर्वप्रथम काढल्याचंही  समोर आलं आहे.

रीना यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर आता सोशल मीडियावर एका नवीन महिला निवडणूक अधिकाऱ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.व्हायरल झालेल्या फोटोमध्ये दिसणारी ही महिला अधिकारी कोण आहे? याबाबत सध्यातरी कुठलीही स्पष्ट माहिती नाही. तरीही या महिला अधिकाऱ्याची हातातील बॅलेट युनिटवर लिहिलेल्या क्रमांकाच्या आधारे ही महिला भोपाळ लोकसभा मतदारसंघातील केंद्रावरील निवडणूक अधिकारी असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. आता याचा शोध लावण्यात पत्रकार गुंतले आहेत. तूर्त हेच फोटो आणि व्हिडीओ पाहत राहा.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!