Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Pakistan : बलुचिस्तानातील ग्वादर येथे पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला, जीवितहानीचे वृत्त नाही

Spread the love

बलुचिस्तानातील ग्वादर येथे एका पंचतारांकित हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला आहे. ३ ते ४ दहशतवादी पर्ल कॉन्टिनेंटल या पंचतारांकित हॉटेलात घुसून गोळीबार करत असल्याची माहिती पाकिस्तानी मीडियाने दिली आहे. या हल्ल्यात एक सुरक्षा रक्षक ठार झाला आहे.

हा गोळीबार होताच हॉटेलमधून बहुतांश लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलीस महासंचालक मोहसीन हसन भट्ट यांनी दिली आहे. बलुचिस्तानातील ग्वादर क्षेत्र चीनसाठी खूप महत्त्वाचं समजलं जातं. येथे चीन पाकिस्तान सरकारसोबत ग्वादर विमानतळदेखील विकसित करत आहे.
‘सायंकाळी सुमारे ४.५० वाजण्याच्या सुमारास पर्ल कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये ३-४ दहशतवादी घुसले. तेथे गोळीबाराचे आवाज येत आहेत. मात्र कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही,’ अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. हॉटेलमध्ये कोणीही परदेशी नागरिक नसल्याची पोलिसांची माहिती आहे. हे हॉटेल ग्वादरच्या कोह-ए-बाटिल डोंगरावर आहे. येथे पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असते. पोलिसांनी हॉटेलच्या आसपासच्या संपूर्ण भागाला वेढा घातल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!