तुम्हाला राजीव गांधींबद्दल बोलायचंय ? बोला , पण तुम्ही राफेल प्रकरणी काय केलं आणि काय केलं नाही हे पण बोला : राहुल गांधी

Advertisements
Spread the love

माजी पंतप्रधान राजीव गांधींचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी ‘भ्रष्टाचारी नंबर १’ असा केल्यानंतर काँग्रेस आणि भाजपातल्या शाब्दिक युद्धाला आणखी धार चढली आहे. हरयाणातील सिरसामधील निवडणूक प्रचारसभेदरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पुन्हा एकवार लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले, ‘तुम्हाला राजीव गांधींबद्दल बोलायचंय, माझ्याविषयी बोलायचंय, बोला.. पण जनतेला हेही सांगा की तुम्ही राफेल प्रकरणी काय केलं आणि काय केलं नाही.’

मोदींनी दिलेल्या आश्वासनांचादेखील राहुल यांनी या सभेत समाचार घेतला. ते म्हणाले, ‘माझे वडील किंवा माझ्याविषयी तुम्हाला जे बोलायचंय ते बोला. पण राफेल आणि दोन कोटी नोकऱ्यांच्या मुद्द्यावरही बोला. तुम्ही तरुणांना दिलेल्या २ कोटी नोकऱ्यांच्या आश्वासनाचं काय झालं, तेही सांगा.’

तुम्ही अनिल अंबानी, नीरव मोदी यांच्यासारख्या तुमच्या श्रीमंत मित्रांना पैसै वाटा, मी गरीबांना पैसे वाटणार. मी १५ लाख रुपये देण्याचं खोटं आश्वसन देणार नाही. मी १५ लाख नाही देऊ शकत, पण ३ लाख ६० हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील याची हमी मी देऊ शकतो, असंही राहुल म्हणाले.