नक्सली हल्ल्यावरून शरद पवारांचा मुख्यमंत्रांवर प्रहार म्हणाले , ज्यांना ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याची अपेक्षा काय ठेवणार ?

Advertisements
Spread the love

जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भुसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात १५ जवान शहीद झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच, या हल्ल्याचा निषेधही नोंदवला आहे. त्यानंतर, माजी संरक्षणमंत्री आणि खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले आहे. तसेच, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध व मृत्यूमुखी पडलेल्या जवानांबद्दल दु:ख व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही पवारांनी म्हटले आहे.

नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सी-60 पथकाचे १५ जवान शहीद झाले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. मी डीजीपी आणि गडचिरोली एसपींच्या संपर्कात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. मुख्यंत्र्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत, शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ज्यांना ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांना जबाबदारीची आठवण करुन दिली आहे. तसेच शहीद पोलीस जवानांबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.