Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तरुण तर तरुण , पालक तर पालक आणि आता मुलेही अडकताहेत मोबाईल इंटरनेटच्या जाळ्यात …

Spread the love

‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ या संस्थेने ‘सायबर अॅलर्ट स्कूल’ या उपक्रमांतर्गत केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे कि , दररोज किमान १ तास ते तब्बल १० तासांपर्यंत बहुतेक शाळकरी मुले इंटरनेटच्या विळख्यात अडकली आहेत . अहवालानुसार ३५ टक्के मुलांचा मोबाइल, टॅब पाहण्याचा कालावधी दररोज एक ते दोन तास आहे. ३० टक्के मुले दोन ते तीन तास, १५ टक्के मुले ४ ते ५ तास, १० टक्के मुले ५ ते ६ तास, १० टक्के मुले ७ ते १० तास स्क्रीनसमोर असतात. ६५ टक्के मुले मोबाइलमधून इंटरनेटचा वापर करतात. त्या खालोखाल कम्प्युटर, लॅपटॉप, टॅबचा वापर होतो. ३२ टक्के मुलांची प्रथम पसंती यू ट्यूबला आहे. ७० टक्के मुले त्यांच्या वयासाठी निषिद्ध असलेले सोशल मीडिया वापरतात. ८१ टक्के मुलांना सायबर सुरक्षेचे ज्ञान नाही. तर ६० टक्के मुलांना सोशल मीडियावरील प्रायव्हसी सेटिंगबाबत माहिती नाही, असेही या अभ्यासातून समोर आले. ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’द्वारे मुंबईतील एच वॉर्डातील २५ शाळांमध्ये चार महिने हा उपक्रम राबवला. सहावी ते दहावीच्या २० हजारांहून अधिक विद्यार्थी, पाच हजार पालक, ६५० शिक्षकांनीही यामध्ये सहभाग घेतला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!