Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आयकर खात्याच्या धाडीमुळे देशभर खळबळ : ३०० अधिकाऱ्यांचा ताफा आणि ५० ठिकाणी छापे !!

Spread the love

देशभरातील नेते आपापल्या पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या धामधुमीत असल्याची नेमकी वेळ साधून आयकर विभागाने संबंधित नेत्यांशी संबंधित लोकांच्या घरावर धाडी टाकण्याचा सपाटा लावल्यामुळे देशभर एकाच खळबळ उडाली आहे . लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरच ३०० आयकर आधिकाऱ्यांनी देशभरात ५० ठिकाणी छापे मारत कोट्यवधींची रोकड जप्त केली आहे. दिल्लीच्या आयकर विभागाने आज मध्य प्रदेशमध्ये प्रवीण कक्कर यांच्या घरावर छापा टाकत आतापर्यंत ९ कोटींची रोकड जप्त केली आहे. प्रवीण कक्कर हे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव म्हणून काम पाहतात. प्रवीण कक्कर यांच्या इंदूरमधील घरावर रविवारी पहाटे तीन वाजता अचानक आयकर विभागाने छापा टाकला. या सर्वधाडीतून नेमका किती ऐवज जप्त झाला याचा नेमका तपशील अद्याप जाहीर करण्यात झालेला  नाही.

ए एन आय ने दिलेल्या माहितीनुसार , प्रवीण कक्कर यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा संशय आहे. कक्कर यांच्या घराची १५ अधिकारी झाडाझडती घेत आहेत. कमलनाथ मुख्यमंत्रिपदी झाल्यानंतर भुपेंद्र गुप्ता यांच्याजागी कक्कर यांची नियुक्ती करण्यात आली होती.  कक्कर यांना उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदकानं सन्मानित केलं होतं. इंदोरशिवाय दिल्ली, भोपाळ आणि गोव्यामध्ये आयकर विभागाने तब्बल ५० ठिकाणी आज रविवारी छापेमारी केली आहे.

आयकर विभागाच्या सुत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीच्या आयकर विभागाने तब्बल ५० ठिकाणी छापेमारी केली आहे.  रात्री उशीरा सुरू झालेली ही कारवाई अद्याप सुरूच आहे. यामध्ये मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव  कक्कर यांच्यासह रातुल पुरी, अमिरा ग्रुप आणि मोसेर बायर यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. इंदोरशिवाय, भोपाळ आणि गोवामध्येही दिल्लीच्या आयकर विभागाने छापे मारले आहेत. या देशभरातील कारवाईसाठी तब्बल ३०० आयकर आधिकाऱ्यांचा समावेश आहे.

भोपाळ येथील प्रतिक जोशी यांच्या घरातून आयकर विभागाने लाखोंची रोकड जप्त केली आहे. इंदोर, भोपाळ, गोवा आणि दिल्लीतील तब्बल ५० ठिकाणी ३०० आधिकाऱ्यांनी छापा मारला असून अद्याप कारवाई सुरूच आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, रातुल पुरी, अमिरा ग्रुप आदींच्या निवासस्थानासह कार्यालयांवरही छापे टाकले.

या प्रकरणात पहिल्या टप्प्यात बहुजन समाज पार्टीच्या आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाने धाडी टाकून विरोधकांमध्ये मोठीखळबळ माजवून दिली होती यावर कुमारस्वामी यांनी सरकारविरोधात टिप्पणीही केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!