Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या …सोलापूर : माकपचा प्रकाश आंबेडकर यांना सक्रिय पाठिंबा

Spread the love

१. सोलापूर लोकसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प्रकाश आंबेडकर यांना संपूर्ण व सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

२. सांगलीतील उमेदवार बदलणार नाही, तात्या शेंडगेच लढणार – प्रकाश आंबेडकर

३. नंदुरबारच्या उमेदवारीने नाराज माजी केंद्रीय राज्य मंत्री माणिकराव गावीत परिवार आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट, नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न

४. एअर मार्शल एन एस धिल्लन यांची स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड प्रमुखपदी नियुक्ती

५. बीड : सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवणाऱ्या १० जणांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई, आणखी ५० जण रडारवर.

६. जालना : बदनापूर तालुक्यातील वरुडी चेकपोस्टवर कारमधून एक रिव्हॉल्वर आणि 2 लाखांची रोकड जप्त. पोलीस आणि निवडणूक विभागाच्या पथकाची कारवाई.

७. औरंगाबादः आ.हर्षवर्धन जाधव यांच्या सभेमुळे शिवसेनेच्या रॅलीचा मार्ग बदलला. गुलमंडीतील सभेत जाधवांची खैरेंवर पुडीवाले बाबा म्हणून जोरदार टीका

८. पंतप्रधान मोदी बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेले होते – प्रियंका गांधी

९. तुमचा नेता कोण? उद्धव ठाकरेंचा महाआघाडीला सवाल

१०. रेल्वे तिकीटांवर मोदींचा फोटो छापल्यानं निवडणूक आयोगाकडून रेल्वे मंत्रालयाला दुसऱ्यांदा नोटीस

११. वडिलांनी याआधीच भाजपाला रामराम करायला हवा होता- सोनाक्षी सिन्हा

१२. अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसकडून घराघरात भांडणे लावण्याचा उद्योग. माझ्यानंतर आमदार शिवाजी कर्डिले यांच्या घरात भांडणे लावताहेत – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंचा पाथर्डी येथील प्रचारसभेत आरोप

१३. अहमदनगरः सावेडी उपनगरातील वैदुवाडी भागात एका पोत्यातून ८४ लाख रुपयांची रोकड पोलिसांकडून ताब्यात; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई, आयकर विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल

१४. औरंगाबाद: जालन्याहून औरंगाबादकडे येणाऱ्या एसटीला दगड मारुन काच फोडणारा सचिन विष्णू डवले याला एक वर्ष सक्तमजुरी व पाच हजार २०० रुपये दंडाची शिक्षा

१५. गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात हार्दिक पटेल सोमवारी सर्वोच्च न्यायालयात मागणार दाद

१६. औरंगाबाद: शिक्षक-कर्मचाऱ्यांसमोर मुख्याध्यापिकेचे मंगळसूत्र हिसकावून घेत जिवे मारण्याची धमकी देणारा संस्थाचालक सचिव रामराव बाबुराव गितेला ३ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!