Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मनपा तर्फे थकबाकी मालमत्ता कराची कार्यवाही जोरात, 1कोटी 45 लाखांची वसुली

Spread the love

औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे थकीत मालमत्ता करासबंधी वसुली व जप्ती कार्यवाही मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत शहरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती औरंगाबाद यांचे कडे मोकळ्या जागेचा कर 2 कोटी 79 लक्ष 36 हजार 103 रुपये थकबाकी होती. मनपा तर्फे वेळोवेळी त्यांच्या तक्रारी चे निवारण करून त्यात दुरुस्ती करून संबंधीतास रीतसर देयक देऊन जप्तीच्या नोटीस देण्यात आल्या होत्या .तसेच 2ते 3 वेळेस त्यांच्याशी थकीत मालमत्ता कराबाबत प्रत्यक्ष बोलणे झाले होते परंतु त्यांनी थकीत मालमत्ता कर भरण्यास नकार दिला त्यामुळे आज नाईलाजाने त्यांच्या कडील थकीत कर रक्कम 2 कोटी 79 लक्ष 36 हजार 103 रुपये अंतर्गत सदरील कार्यालय सील करण्यात आले.

तसेच प्रोझोन माँल कडे एकूण थकबाकी 2कोटी 89लाख थकबाकी पैकी 1कोटी45लाख 31हजार544रू वसुल करण्यात आले ऊर्वरीत रक्कम 1कोटी 44लाख पुढील महीन्यात भरणार आहे.
सदरील कार्यवाही मा आयुक्त डॉ निपुण विनायक यांच्या आदेशाने व मा कर निर्धाराक व संकलक श्री महावीर पाटणी यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड अधिकारी श्री कमलाकर ज्ञाते , मिरा चव्हाण,शाखा अभियंता सुभाष मोटे, कर निरीक्षक प्रभू चव्हाण, श्री रमेश घुले,श्री राहुल बनकर,श्री शेषराव वाघमारे ,श्री सोनी,श्री कांबळे,श्री नजीर खान,श्री सोनार,श्री कापसे यांच्या पथकाने पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!