Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा निवडणूक २०१९ : राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नीच्या सभे प्रसंगी कार्यकर्त्यावर हल्ला

Spread the love
राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सारिका सोनवणे यांची सभा चालू असताना  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याची घटना घडली असून यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली  आहे.
याविषयी अधिक माहिती अशी कि, धारूर तालुक्यातील धर्माळा येथे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पत्नी सौ. सारिका सोनवणे, जिल्हा परिषद सदस्या यांची प्रचार सभा चालू असताना सभेच्या ठिकाणा पासून जवळच अंतरावर असलेल्या वैजीनाथ भैरू सोळंके या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यास यास याच गावातील माथेफिरू तरुण गणेश कदम यांनी या ऊस तोडण्याच्या कोयत्याने मारहाण केली यात वैजीनाथ सोळंके यांच्या हाताला गंभीर स्वरूपाचा मार लागलेला आहे. वैजनाथ सोळंके हे सरपंच आहेत. या हल्ल्यात नवनाथ सोळुंके हे सुद्धा जखमी झाल्याचे वृत्त आहे .
सभेवर दगडफेक करून या माथेफिरू तरुणाने सभेच्या ठिकाणी दहशत निर्माण करून सभेच्या ठिकाणी असलेल्या चार ते पाच मोटारसायकलीवर वार करून नासधूस केली आहे. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान सदर हल्ला गणेश कदम याने दारूच्या नशेत व व्यक्तिगत कारणावरून केला असल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. या मागचे नेमके कारण काय? याचा शोध पोलीस घेत आहेत.

मी सुखरूप आहे : सारिका सोनवणे

आपल्या वरील हल्ल्याानंतर सारिका सोनवणे यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन म्हटले आहे की, कठीण प्रसंगी माझ्या व आपले उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी असलेल्या बीड जिल्ह्यातील तसेच सबंध महाराष्ट्रातील लोकशाहीवादी नागरिकांचे आभार. मात्र, आपण कोणीही काळजी करू नका मी सुखरुप आहे. आपणा सर्वांची साथ आहे तोपर्यंत जिल्ह्यातील गुंड प्रवृत्तिच्या विरोधात आवाज उठवत राहील, सर्वसामान्यांसाठी लढत राहील..

आपलं सरकार

Click to listen highlighted text!