News Updates : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी .सी. घोष भारताचे पहिले लोकपाल

Advertisements
Spread the love

1. आपली युती फुलांसारखी सदैव टवटवीत ठेवणं आणि जनतेला त्याचा सुगंध देणं ही आपली जबाबदारी आहे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

2. मराठवाड्यातील आठही जागांवर युतीचे उमेदवार निवडून येतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

3. भाजप-शिवसेना युतीप्रमाणे अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांचा फेविकॉलचा मजबूत जोड: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

4. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पीसी घोष देशाचे पहिले लोकपाल.
5. आठ  तासांच्या प्रदीर्घ बैठकीनंतर भाजप जाहीर करणार पहिली यादी
6. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटर हँडलचे नाव बदलून ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ ठेवले.
7. गोव्यात भाजपची बैठक सुरू. मनोहर पर्रिकर यांच्यावर निर्णय होण्याची शक्यता.
8. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी लखनऊला पोहोचल्या.

9. ट्रक-कारच्या भीषण अपघातात ४ जण ठार. नगर-जामखेड रोडवर पहाटे घडली दुर्घटना.

10. तृतियपंथी काजल नायकला बसपाकडून विधानसभेचे तिकिट. कोरेई , ओरिसा मतदारसंघातून निवडणूक लढवणार.

11. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मालदीवच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना.

12. मोदी (Modi) चा अर्थ मसूद, ओसामा, दाऊद, आयएसआयः काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांचे वादग्रस्त विधान.