Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Update : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

Spread the love

 

1. सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री आदेल-अल-जुबेर यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

2. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले विविध विकासकामांचे उद्घाटन.

3. २०१९ च्या सुरुवातीला ७० दिवसांत ४४ दहशतवाद्यांना कंठस्नान; २०१८ मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर १,६२९ वेळा, तर यावर्षी आत्तापर्यंत ४७८ वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघनः सेनेची माहिती

4. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उद्या गुजरात दौऱ्यावर

5. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत

6. दहशतवादी मसूद अजहरला सन्मानाने संबोधित केल्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर केंद्रीयमंत्री स्मृति ईराणी यांचे टीकास्त्र

7. मध्य प्रदेशः संजना सिंह सरकारी नोकरी मिळणाऱ्या पहिल्या ट्रान्सजेंडर बनल्या

8. पंजाबः लोकसभा निवडणुकांच्या १३ जागांसाठी ६ पक्षांचे गठबंधन

9. औरंगाबाद: इयत्ता सातवीतील विद्यार्थिनीची छेड काढणारा रिक्षाचालक जितेंद्र दिलीप गावंडे यास तीन वर्षे सक्तमुजरी

10. औरंगाबाद: पत्नीच्या राजीनाम्यासाठी चाकुहल्ला करणारे डॉ. अब्दुल हफीज अब्दुल कासीम शेख व मुनवर अहमद नईम अहमद यांना दोन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड

11. राफेलप्रकरणी आम्ही एवढे प्रश्न उपस्थित केले. मात्र, पंतप्रधान मोदींनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही – राहुल गांधी

12. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांचा शिवसेनेत प्रवेश

13. सरकार येणार नाही म्हणूनच शरद पवार यांची माघार; केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांची टीका

14. औरंगाबाद जिल्ह्यात लोकसभेसाठी १८ लाख ५७ हजार ६४५ मतदार; जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची पत्रकार परिषदेत माहिती.

15. बाळासाहेब विखेंचा पराभव आम्हीच केला: शरद पवार

आपलं सरकार

Click to listen highlighted text!