Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra : विधानसभा, लोकसभा निवडणुका एकत्र होणार असल्याच्या केवळ अफवा : मुख्यमंत्री

Spread the love

महाराष्ट्रात लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्यात येणार असल्याच्या चर्चा  दिवसभर रंगलेल्या असताना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अफवा असल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होणार नाहीत, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे .  एकाच आठवड्यात दोन दिवस राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतेय. तसंच कॅबिनेटच्या बैठकीत उद्या तब्बल ५० प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका लावला आहे. नागपूर मेट्रोचं उद्घाटन आज करण्यात येतंय. यामुळे लोकसभेसह राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्यासाठी शिवसेना-भाजपची ही तयारी सुरू असल्याचा अंदाज  लावला जात होता. मुंबईतील राजकीय वर्तुळातही याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. त्यातच  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी यासंदर्भात ट्विट करताना म्हटले , विधानसभा बरखास्तीचा सरकारचा डाव असल्यास तो राजकीय संधिसाधू वृत्तीने जनतेचा विश्वासघात असेल‌.  मात्र मुख्यमंत्र्यांच्या या खुलाशाने या चर्चा आता थांबण्याची चिंन्हे आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!