Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

इव्हीएमवरील संशयावरून मुख्य निवडणूकआयुक्तांची नाराजी

Spread the love

गेल्या काही काळापासून मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या इव्हीएमवर सातत्याने संशय घेतला जात आहे. दरम्यान मुख्य निवडणूकआयुक्त सुनील अरोडा यांनी राजकीय पक्षांकडून इव्हीएमवर घेण्यात येत असलेल्या संशयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजकीय पक्षांनी इव्हीएमचा फुटबॉल बनवून ठेवला आहे, असे सुनील अरोडा यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाचे पथक मंगळवारी जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अरोडा यांनी इव्हीएमवर संशय घेणाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली. ”काही महिन्यांपूर्वी कर्नाटकबरोबरच इतर पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे निकाल लागले. मी सांगताना क्षमा मागतो, पण इव्हीएमचा फुटबॉल बनवून ठेवला आहे. निकाल एक्स लागला तर इव्हीएम चांगल्या आणि निकाल वाय लागला तर इव्हीएम खराब, असे म्हटले जाते,”असे सुनील अरोडा म्हणाले. इव्हीएम मतदान करत नाही. तर तुम्ही आम्ही मतदान करतो. त्यामुळे इव्हीएमच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य ठरणार नाही. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा इव्हीएमवर शंका घेतल्या जातात,” अशी खंतही मुख्य निवडणूक आयुक्तांनी व्यक्त केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!