Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Abhinandan Welcome : भारताचे वीरपूत्र अभिनंदन यांचे आज भारतात आगमन , देशात आनंद

Spread the love

भारतीय हवाई हद्दीत घुसून काश्मिरातील लष्करी तळांना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानच्या एफ-१६ विमानाचा वेध घेणारे हवाई दलाचे वीरयोद्धा विंग कमांडर अभिनंदन वर्तमान आज, गुरुवारी सकाळी मायदेशी परतणार आहेत. शांततेचे आर्जव व चर्चेचे आवाहन करीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी पाक संसदेत अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा केली होती .
भारतीय हद्दीत शिरलेल्या २४ विमानांच्या ताफ्याचा काश्मिरातील नौशेरा व राजौरी क्षेत्रातील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा कट बुधवारी हवाई दलाने उधळून लावला. ‘मिग २१ बायसन’ विमानाचे सारथ्य करणाऱ्या अभिनंदन यांनी पाकच्या ‘एफ १६’ विमानाचा वेध घेत जमीनदोस्त केले. मात्र, त्याचवेळी त्यांचे विमानही अपघातग्रस्त झाले. विमान कोसळण्यापूर्वी अभिनंदन यांनी पॅराशूटद्वारे विमानाबाहेर झेप घेतली, मात्र ते पाकच्या भूभागात पोहोचल्याने त्यांना तेथील सैनिकांनी ताब्यात घेतले.

अभिनंदन यांना मारहाण झाल्याने भारताने पाककडे निषेध व्यक्त करीत व जीनिव्हा कराराचा दाखला देत, त्यांच्या तात्काळ सुटकेची मागणी केली होती. पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी गुरुवारी सकाळी शांततेचा सूर आळवत ‘तणाव निवळण्यासाठी अभिनंदन यांची सुटका करण्यास पाक तयार आहे’, असे वक्तव्य केले होते . मात्र, अभिनंदन यांच्या मुक्ततेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही, असे भारताने स्पष्ट केले. त्यानंतर काही तासांतच संसदेच्या संयुक्त अधिवेशनात पंतप्रधान खान यांनी, ‘भारताशी चर्चा सुरू होण्याचे पहिले पाऊल म्हणून पाकिस्तान शुक्रवारी अभिनंदन यांची सुटका करील’, अशी घोषणा केली व सभागृहातील पाक खासदारांनी या घोषणेचे बाके वाजवून स्वागत केले.

अखेर आज भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन आपल्या मायभूमीत परत येत असून त्यांच्या आगमनाचा भारतात आनंद व्यक्त केला जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!