Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विश्वकप, सुनील गावस्कर , भारत – पाकिस्तान आणि इम्रान खान !!

Spread the love

इम्रान खान यांच्याकडून गावस्करांच्या अपेक्षा

क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानला बहिष्कृत करून भारताचं नुकसान होईल. त्याऐवजी पाकिस्तानशी क्रिकेटच्या मैदानात भिडून त्यांना मात देत त्यांचं नुकसान करणं भारताच्या हिताचं आहे, असं मत इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे . आपलं मत स्पष्ट करताना त्यांनी म्हटले आहे कि , ‘वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय भारताने घेतला तर कोण जिंकेल? मी सेमी फायनल आणि फायनलबद्दल बोलतच नाहीए. कोण जिंकेल? पाकिस्तान जिंकेल कारण भारत न खेळल्यास त्यांना दोन गुण मिळतील.’
गावस्करपुढे म्हणतात , ‘वर्ल्ड कपमध्ये भारताने आतापर्यंत जवळपास प्रत्येक वेळी पाकिस्तानला हरवले आहे. त्यामुळे जर आपण त्यांना हरवले तर आपल्याला दोन गुण मिळणार आहेत. म्हणजेच पाकिस्तान दोन गुणांअभावी स्पर्धेत आगेकूच करु शकणार नाही. अर्थात मी देशासोबतच आहे. सरकारने जर ठरवले की पाकिस्तानसोबत खेळायचे नाही तर मी सरकारसोबतच आहे.’
दोन देशांमधील क्रिकेट २०१२ पासून थांबले आहे. या दोन्ही संघांनी अखेरची पूर्ण मालिका २००७ मध्ये खेळली होती. गावस्कर पुढे म्हणाले, ‘पाकिस्तानचं नुकसान केव्हा होईल जेव्हा ते दोन देशांतील मालिका खेळणार नाहीत. पण जेव्हा दोनहून अधिक संघ स्पर्धेत असतील तेव्हा पाकिस्तानविरुद्ध न खेळून भारताचं नुकसान होणार आहे. पाकिस्तानविरुद्धचे सामने न खेळून ते दोन गुण गमावूनही पात्र ठरण्यास भारत समर्थ आहे. पण त्यांच्याशी मैदानावर दोन हात करत ते पात्र ठरणार नाहीत याची तजवीज करणं अधिक गरजेचं आहे, असं मला वाटतं. त्यांच्याशी न खेळण्यामागच्या लोकांच्या भावना मला समजू शकतात, पण या सगळ्याकडे अधिक खोलात जाऊन पाहण्याची गरज आहे.’ इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरु होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला खेळण्यास बंदी घालावी, अशी मागणी बीसीसीआय आयसीसीकडे करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर गावस्कर बोलत होते.
‘इम्रान खान यांच्याकडून अपेक्षा
‘इम्रान खान हे माझे चांगले मित्र आहेत. मला त्यांना थेट सांगावसं वाटतं की तुम्ही नव्या पाकिस्तानबद्दल बोलत आहात. भारत एक पाऊल उचलेल तर पाकिस्तान दोन पावले पुढे येईल असं तुम्ही म्हणालात. पण राजकारणी म्हणून नव्हे तर खेळाडू म्हणून तुम्हाला मला सांगावसं वाटतं की पाकिस्तानने एक पाऊल पुढे येण्याची गरज आहे. तुम्ही सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबवा, जे समस्या निर्माण करत आहेत, त्यांना भारताच्या किंवा युरोपीय संघाच्या ताब्यात द्या. ही दोन पावलं नव्या पाकिस्तानने उचलली तर भारत अनेक मैत्रीपूर्ण पावले उचलेल,’ असे आवाहनदेखील गावस्कर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांना केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!