Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

देवीच्या दर्शनास निघालेल्या कारला अपघात ७ ठार ४ जखमी

Spread the love

तुळजापूर सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर घाटातील वळणावर टॅंकर व कारचा विचित्र अपघात होऊन त्यात चार बालक, दोन महिला व पुरुष असे एकूण सात जण जागीच ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना पुढील उपचारांसाठी उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी झालेल्या अपघातातील अपघातग्रस्त वाहनांना आदळून टँकर या कारवर पलटी झाल्याने हा अपघात घडला. अपघातग्रस्त कुटुंबीय सोलापूरहून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघाले होते.
सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घाटशीळ घाटातील वळणावर तुळजापूरकडून सोलापूरकडे जाणारा टँकर क्रमांक एम.एच.१३ आर ६५३७ व सोलापूर कडून येणारी स्विफ्ट कार क्रमांक एम एच १२ वाय ये ३६७२ यावर टँकर पलटी होऊन कारमध्ये असणारे हे सात जण जागीच ठार झाले.
मृतांची नावे – वर्षा लिंगराज आडम (१२), रजनी प्रेमकुमार चिलवेरी (३५), शिवकुमार गोविंद पोबत्ती (४०), नर्मदा शिवकुमार पोबत्ती (३५), नेताजी शिवकुमार पोबत्ती (१२), श्रद्धा शिवकुमार पोबत्ती (४), अपूर्वा प्रेमकुमार चिलवेरी (१३) गंभीर जखमींची नावे – नागेश जनार्दन क्यातम (३२), मयुरी नागेश क्यातम (२५), कृतिका शिवकुमार पोबत्ती (१५), श्रावणी भालचंद्र गड्डम (८)
दिनांक १७ रोजी कंटेनर आणि टँकर यांचा जो अपघात झाला होता त्याच वाहनाला हा टँकर धडकला व खालून येणाऱ्या कारवर पलटी झाला यामुळे ही दुर्घटना घडली. रविवारी झालेल्या अपघातातील दोन्ही वाहने त्या जागेवरून हटवली असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसती अशी चर्चा होत होती. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस विभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक, अग्निशामक दलाचे वाहन व रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने कारवरील टँकर बाजूस काढून आतील सर्व मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!