Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत उत्स्फूर्त बंद

Spread the love

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज सकाळी नालासोपारा येथे प्रवाशांनी उत्स्फूर्त रेल रोको केल्यानंतर, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत असून रस्त्यावर उतरून नागरिक निषेध करत आहेत. नालासोपारा येथे झालेल्या रेल रोकोनंतर मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
नालासोपारा येथे रेल रोको झाल्यानंतर नालासोपारा परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. नालासोपाऱ्यात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तेथील नागरिकांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेधही केला. मुंबईतील विविध ठिकाणी नागरिकांनी आपापल्या परिसरात बंद पाळत हल्ल्याचा निषेध नोंदवला. तर, अनेक ठिकाणी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दक्षिण मुंबईतील ताडदेव, तसेच ग्रँड रोड परिसरात दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. मुंबईतील हाजीअली परिसरातील प्रसिद्ध हिरापन्ना मार्केटबाहेर देखील तेथील कर्मचारी आणि नागरिकांनी २ मिनिटांचे मौन पाळून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मुंबईतील महाविद्यालयांमध्येही निषेध
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मुंबईतील विविध महाविद्यालयांमध्ये विविध पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला. या निषेध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला. नवी मुंबईतील बेलापूर भागातही पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत कडकडीत बंद पाळण्यात आला. कळंबोलीमध्येही स्थानिक नागिरकांनी रस्त्यावर उतरून हल्ल्याचा निषेध केला. तसेच अनेक ठिकाणी नागरिकांनी वस्त्यावस्त्यांमध्ये मोर्चे काढत हल्ल्याचा निषेध केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!