Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजधानीत रंगले पोस्टर युद्ध …

Spread the love

‘जिसके हाथ में चाय का झूठा कप देना था, उसके हाथ में जनता ने देश दे दिया’।

लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे देशात सर्वत्र वातावरण तापत असून यानिमित्ताने परस्परांवर टीका करण्यासाठी जणू पोस्टर्स युद्ध सुरु झाले आहे . यात भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या विरोधात तर काँग्रेसकडून भाजप आणि मोदींच्या विरोधात पोस्टर्स मोहीम सुरु करण्यात आली आहे . अशाच एका पोस्टरच्या माध्यमातूनही मोदींवर निशाणा साधण्यात आला असून यात ज्याच्या हातात उष्णता कप द्यायला हवा होता त्याच्या हातात जनतेने देश दिला असे पोस्टर लावल्याने भाजपा नेते अमित मालवीय यांनी या प्रकरणात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये एक व्हिडीओही जारी करण्यात आला आहे. मालवीयनं लिहिलं आहे की, विरोधी पक्ष मोदींच्या भूतकाळातील गोष्टींवर नेहमीच त्यांना टार्गेट करतात. मागासवर्गीय किंवा अनुसूचित जाती-जमातीचा असणं हा अभिशाप आहे काय ?, असा प्रश्नही मालवीय यांनी उपस्थित केला आहे.
आंध्र प्रदेशला विशेष राज्याच्या दर्जाच्या मागणीसाठी तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे नवी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणास बसले आहेत. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांच्या हातात चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्यांच्या हातातच जनतेनं देश सोपवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना चाय वाला म्हटलं जाते. एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाल्यानं अनेकांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!