It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

भाईजानचा ‘टायगर जिंदा है’पण तेलगूमध्ये …

Spread the love

भाईजानचा ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धम्माल करणार आहे. लवकरच हा चित्रपट रिलीज होणार आहे. अर्थात या चित्रपटात सलमान खान नसणार. इतकेच काय, सलमानची ‘लकी चार्म’ कॅटरिना कैफही नसणार. होय, याचे कारण म्हणजे, हा चित्रपट तेलगू भाषेत तयार होणार आहे. म्हणजेच ‘टायगर जिंदा है’चा तेलगू रिमेक बनणार आहे. साहजिकचं, या तेलगू रिमेकमध्ये टायगरच्या रूपात सलमान नसेल.  टायगरची ही भूमिका तामिळ स्टार गोपीचंद साकारणार आहे. तर कॅटरिनाची भूमिका अभिनेत्री तमन्ना भाटिया साकारणार आहे. ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे. २०१७ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धूम करत, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ३४ कोटींची विक्रमी कमाई केली होती.