Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

26 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेले असेल : संजय राऊत

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : बारामतीची लढाई आता सोपी राहिलेली नाही. 26 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेले आपण पाहाल. त्यामुळे कोण- काय बोलतं? कुणाचे काय दावे आहेत? याला काही महत्व नाही. त्यांना म्हणावं आधी आपण जिंकून या… अजित पवारांसह सगळ्यांना माझं सांगणं आहे की आधी आपण जिंकून या… बारामतीची लढाई आता सोपी राहिलेली नाही, असं संजय राऊत म्हणाले.असं संजय राऊत म्हणालेत.

यंदाच्या निवडणुकीत अजित पवार हे किंगमेकर ठरतील, असे विधान अजित पवार गटाचे शिवाजीनदर मानखुर्द विधानसभेचे उमेदवार नवाब मलिक यांनी केले . त्यावर संजय राऊतांनी भाष्य केले आहे. निकाल लागल्यावर कळेल कोण किंगमेकर आणि कोण किंग आहे ते… उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच सरकार येईल. या राज्यामध्ये 26 तारखेला महाविकास आघाडीच सरकार स्थापन झालेलं आपण पहाल. कोण काय बोलताय कोणाचे काय दावे आहेत हे आता कशाकरता? आधी जिंकून या, अजित पवार यांच्यासह आधी सर्व जिंकून या. बारामतीची निवडणूक आता सोपी राहिलेली नाही, असे संजय राऊत म्हणाले.

Advertisements

एकनाथ शिंदेंवर निशाणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रचारसभेवर संजय राऊतांनी टीका केली आहे. ते भाजपचेच मुख्यमंत्री आहेत… एकनाथ शिंदे यांना भाजपच्या पालख्या वाहाव्या लागणार आहेत त्यात नवीन काय आहे. ज्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत. त्यांना भाजपच्या चपला उचलाव्या लागत आहेत, असं संजय राऊत म्हणालेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!