Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिली माहिती….

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : राज्यात २० नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे आम्ही नोव्हेंबरमध्येच देणार असल्याचे मोठी अपडेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ‘आम्ही देणारे लोकं आहोत, घेणारे लोकं नाहीत. तर लाडक्या बहिणींना लखपती करण्याचं माझं स्वप्न आहे’, असे म्हणत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पुढे शिंदे म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचे पैसे अडकायला नको, म्हणून नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबर महिन्यात दिलेत’, तर आता २० नोव्हेंबर रोजी निवडणुका आहेत. २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल आहे. त्यामुळे याच नोव्हेंबर महिन्यात सरकारकडून डिसेंबर महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांना देण्यात येणार आहे. कारण आम्ही देणारे लोकं आहोत. घेणारे लोक नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Advertisements

येणाऱ्या निवडणुकीत लाडक्या बहिणांचा चांगला आशीर्वाद मिळाला तर लाडक्या बहिणांना योजनेत मिळाले १५०० रूपये वाढवून त्यांना देऊ. माझ्या बहिणांना मला लखपती बनवायचं आहे, असं माझं स्वप्न आहे. असंही पुढे एकनाथ शिंदे यांनी सांगितेल.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!