Accident News Update : ट्रक- बसचा समोरासमोर भीषण अपघात , चालकासह 5 गंभीर, 30 जखमी…

खासदार हेमंत पाटील , आ. संतोष डांगर यांच्याकडून हिंगोली व औंढा, रुग्णालयातील जखमींची विचारपूस
औंढा नागनाथ: | प्रभू नांगरे : परभणी रोडवर वगरवाडी नजीक वसमत- औंढा बसला ट्रकने समोरासमोर धडक दिली असून या अपघातात बसमधील 30 प्रवासी जखमी झाले. त्यात एस टीचा चालक व वाहक हा गंभीरित्या जखमी असून जखमींना औंढा आणि हिंगोली येथील रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.
दरम्यान हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे त्याच रस्त्याने दौऱ्यानिमित्त जात असताना हा झालेला अपघात पाहताच क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपली गाडी थांबविली व सर्व जखमींना मदत केली. तसेच जखमीची दवाखान्यांमध्ये विचारपूस करून गंभीर जखमी प्रवाशांना स्वतः सोबत जाऊन हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात भरती केले व रुग्णांवर तात्काळ उपचार सुरू करा अशा डॉक्टरांना सूचना केल्या .
मोठा अनर्थ टळला…
हा अपघात एवढा भीषण होता की, एसटी समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला त्यामुळे रोडच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठा रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे भीषण अपघात झालेल्या ट्रक मध्ये गॅसचे भरलेले सिलेंडर होते . नागनाथाच्या कृपेने होणारा मोठा अनर्थ टळला असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
ही घटना सायंकाळी पाचच्या दरम्यान झाली. एचपी गॅसचा ट्रक एम एच 26 बी इ 66 71 हा नांदेड वरून औरंगाबादकडे जात होता तर एसटी क्रमांक एम एच 20 BL 3976 ची बस ही सायंकाळी पाचच्या दरम्यान औंढा नागनाथ वरून वसमत कडे जात होती. ही बस वसमत आगारातील आहे.
यामध्ये जवळपास 30 प्रवासी जखमी झाले. त्या जखमीमध्ये वृद्धांसह बालकांचा समावेश आहे .सदरील घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अफसर पठाण , हट्टा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले .
तत्काळ मदतकार्य…
औंढा ते परभणी रोडवर एसटीची धडक झाल्यामुळे बस ही रोडच्या मधोमध उभी राहिल्यामुळे रोडच्या दोन्हीही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बसमधील किरकोळ जखमी प्रवाशांना औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यासाठी शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, लल्ला देव, वकील सोपान ठोंबरे ,संतोष देशमुख यांनी सहकार्य केले .
या अपघातात एसटीच्या चालकासह गंभीर जखमी झालेल्या चार प्रवाशांना औंढा नागनाथ येथे डॉ. सतीश वाकळे यांनी प्राथमिक उपचार करून हिंगोली येथे रेफर केले असता खासदार हेमंत पाटील, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर व त्यांचे शिवसैनिक यांनी गंभीरित्या जखमी असलेल्या प्रवाशांना हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे घेऊन आले व त्यांना उपचार सुरू होईपर्यंत रुग्णालयात थांबून होते. उपचार सुरळीत होताच खासदार हेमंत पाटील हे आपल्या प्रवासाला निघाले.
यावेळी औंढा नागनाथ ग्रामीणरुग्णालयातील डॉ.सतीष वाकळे , सिस्टर आश्विनी गायकवाड ,सिस्टर नंदा सारंग, दशरथ खंदारे, सुनील घुगे, विशाल मुळे, संदीप शंखपाळ, बाळू भोये रुक्मिणी क्षीरसागर यांनी प्राथमिक उपचार या कर्मचाऱ्यांनी जखमेवर उपचार केले तर औंढा नागनाथ दवाखान्यामध्ये एसटी महामंडळाचे हिंगोली विभागीय अधिकारी अमृतराव कच्छवे, एसटी स्थानक प्रमुख हिंगोली शेख फिरोज ,औंढा वाहतूक नियंत्रक सचिन पटवे ,नवनाथ घुगे ,सचिन पुंडगे यांनी भेट देऊन जखमेची विचारपूस केली.
दरम्यान औंढा परभणी रोडवर आडवी झालेली बस ही क्रेनच्या साह्याने रोडच्या बाजूला काढून रोड पूर्णपणे साडेसहा वाजता मोकळा करण्यात आला आहे. त्यामुळे या रोडवरील वाहतूक पावणे सात वाजता सुरळीत झाली असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.
गंभीर जखमींची नावे…
गंभीर जखमी रुस्तुम सारंग एसटी ड्रायव्हर वय 50, राहणार हयातनगर ,अंकुश वायकुळे वय वर्ष 50 राहणार लोहगाव, अंबादास बोंगाणे वय वर्ष 60 राहणार उमरा , प्रदीप तोरकड वय 34 वर्ष राहणार खांडेगाव, कोंडबा जाधव वय वर्ष 51 राहणार मरसूळ हे पाच जण गंभीर जखमी झाले हिंगोली येथे दाखल करण्यात आले आहे.
किरकोळ जातींची नावे…
किरकोळ जखमी मध्ये छायाबाई सवंडकर वय 35 टेंभुर्णी, चिंतामणी काळे वय 60 चोढी काठोडा ,नर्मदा गु-हाडे वय 60 वाई ,दिलीप सवंडकर वय 30 वर्ष टेंभुर्णी ,कणिकनाथ ठोंबरे वय 23 सारंगवाडी ,शिवाजी सवडकर वय 35 टेंभुर्णी ,शेख अखिल शेख भूषण वय 80 वर्षे गिरगाव, गुलाब राठोड वय सत्तर वर्षे वसमत ,राणी ढाले वय 25 कुरुंदा,सत्यभामा श्रीरंग जाधव वय 54 राहणार म्हातारगाव , शिवाजी खंदारे वय सत्तर वर्ष येळी ,शामराव जाधव 19 वर्षे म्हातारगाव ,रुद्र ढाले वय 6 वर्षे कुरुंदा ,कार्तीक ढाले वय 19 रा. कुरुंदा ,आरती ढाले वय 5 कुरुंदा ,अभीलाषा स्वामी वय वर्षे 24 वसमत, राजेश सवंडकर वय 17 टेंभुर्णी ,शहबाज भूषण बेग वय 21 लिंबाळा ,अशपाक हुसेन बेग वय 16 लिंबाळा ,धुरपताबाई मुळे वय 50 औंढा नागनाथ आदींचा समावेश आहे.