धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

Advertisements
Advertisements
Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांच्या छातीच्या बरगड्यांना मार लागल्यामुळे दोन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या होत्या. गेल्या १६ दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या वेळी पत्नी राजश्री मुंडे उपस्थित होत्या. कार्यकर्ते देखील होते.

Advertisements

३ जानेवारीला परळीहून आपल्या राहत्या घरी जात असतांना मुंडेंच्या बीएमडब्ल्यूचा, चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला होता. या अपघातात धनंजय मुंडे यांना छातीच्या बरगड्यांना मार लागल्यामुळे दोन बरगड्या फ्रॅक्चर झाल्या होत्या आणि डोक्यालाही काही जखमा होत्या. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला असून एअरबॅग्स उघडल्यामुळेच मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. गेल्या १६ दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या त्यांची प्रकृती सुधरली असून पुढील काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान, पुढील काही दिवस डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली असल्याने मुंबईतील निवासस्थानी काही दिवस विश्रांती घेऊन परळी येथे लवकरच सर्वांना भेटून पुन्हा जनसेवेत दाखल होणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, सक्तीच्या विश्रांतीसाठी पुढील काही दिवस सहकारी-कार्यकर्त्यांनी भेटायला येऊ नये, असे आवाहन मुंडे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.

४ जानेवारीला धनजंय मुंडे यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली होती. यामध्ये धनंजय मुंडे म्हणाले होते कि, मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम व भेटी आटोपून परळीकडे परतताना रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामळे माझ्या गाडीचा लहानसा अपघात झाला आहे. यामध्ये माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी सध्या मला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

 

मुंबई – गोवा महामार्गावर भीषण अपघात, ९ जण जागीच ठार

 


#DhanajayMunde #Maharashtra #Accident #MahanayakNews #Mahanayak #NewsUpdte #Currentnewsupdate

Mahanayak news Updates on one click
https://www.mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!