शिर्डी महामार्गावर, साई भक्तांचा भीषण अपघात १० जणांनाच मृत्यू

सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सकाळच्या सुमारास बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे या खासगी बसमध्ये एकूण ५० प्रवाशी असून सुमारे दहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक विभागीय आयुक्त, तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. अपघातासंदर्भात त्यांनी दुःख व्यक्त केले. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी-नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत, तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
अंबरनाथ, ठाणे, उल्हासनगर येथून साई भक्त शिर्डी येथे दर्शनाला जात असतानाच सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथेर गावच्या जवळ पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाके दरम्यान एकेरी वाहतूक सुरू असतांना खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला आहे. बसमधील अनेक प्रवाशी जखमी झाले आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना सिन्नर आणि नाशिकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, यात किती जण गंभीर जखमी व मृत्यू झाले आहेत याचा सविस्तर आकडा आणखी समजलेला नाही. दरम्यान, प्रत्यक्षदर्शींना दिलेल्या माहितीनुसार सुमारे १० जणांचा मृत्य झाला असून यात सात महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुले मृत्युमुखी झाल्याचे वृत्त आहे. तर, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
उल्हासनगर येथून १५ बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला आहे. मुंबई येथून शिर्डी कडे जाणारी खाजगी आराम बस क्रमांक एम एच ०४ एसके २७५१ व शिर्डी कडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालट्रक क्रमांक एम एच ४८टी १२९५ यांची समोरासमोर धडक होऊन हा आपघात झाला.
#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
#Live #CurrentNewsUpdate #AccidentNews #ShirdiNews #ShirdiAccident #MahanayakNews #Mahanayakonline #Gallitedilli
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY